शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर

By admin | Updated: October 26, 2014 22:46 IST

तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून

३० सप्टेंबरला मुदत संपली : परवानगीसाठी लिलाव खोळंबलेयवतमाळ : तब्बल महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील रेती घाटांची मुदत संपली. मात्र अद्यापही रेतीघाट लिलावाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही. अशा स्थितीत रेतीघाट चोरट्यांच्या निशाण्यावर असून जिल्ह्यातील रेती घाटातून दररोज शेकडो ब्रास रेती शहरात पोहोचत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने लिलावाला मंजुरी दिली असली तरी पर्यावरण विभागाने अद्यापही परवानगी दिली नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे.यवतमाळ जिल्ह्यात २९५ रेती घाट आहेत. नदी, नाल्यावर असलेल्या या रेती घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. मात्र अद्यापही या रेती घाटांचा लिलाव झाला नाही. विशेष म्हणजे खनिकर्म विभागाने २०१३ मध्ये लिलाव केलेल्या घाटांची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे कंत्राटदारांंचा घाटावरील ताबा संपुष्टात आला आहे. ही मुदत संपण्यापूर्वी जिल्हा खनिकर्म विभागाकडून रेती घाटांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात रेती घाटाची लिलाव प्रक्रिया खोळंबली आहे. अधिक माहिती घेतली असता रेती घाट असलेल्या सर्व ग्रामपंचायतींनी लिलावासाठी परवानगी दिली आहे. असे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आले. त्यातील ९५ रेती घाटांचे लिलाव करण्याची मंजुरी भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे. मात्र पर्यावरण विभागाने अद्याप एकाही रेती घाटाला परवानगी दिली नाही. त्यामुळे लिलाव खोळंबला आहे. गतवर्षी रेती घाटांच्या लिलावातून प्रशासनाला १७ कोटींचा महसूल मिळाला होता. यावर्षी आलेल्या निवडणुका आणि दिवाळीमुळे रेती घाटांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. अशा स्थितीत रेती माफियांनी घाटांवरून रेती चोरण्याचा सपाटा लावला आहे. रात्रीच्या वेळी ट्रक-ट्रॅक्टरद्वारे रेती चोरुन शहरात आणल्या जाते. शहराबाहेर रेतीचे मोठे ढिगारे तयार झाले आहे. पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर रेतीचे अनेक घाट आहेत. या घाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती साठा आहे. परंतु या घाटांची मुदत संपली असून नवीन लिलाव प्रक्रिया झाली नाही. तरीही या घाटांवर अनेक वाहने रेती चोरताना दिसून येतात. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीच्या काळात महसूल प्रशासन व्यस्त होते. त्यामुळे दुर्लक्ष झाले. त्यानंतर दिवाळी आली. सुट्यांमुळे कुणीही घाटांवर लक्ष दिले नाही. याचा फायदा रेती माफियांनी घेत रेती चोरीचा सपाटा लावला आहे. (शहर वार्ताहर)