शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १० हजार मोलकरणींची नोंद

By admin | Updated: October 20, 2016 01:42 IST

जिल्ह्यात तब्बल १० हजार मोलकरणी असल्याचे कामगार कल्याण कार्यालयातील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात तब्बल १० हजार मोलकरणी असल्याचे कामगार कल्याण कार्यालयातील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. बुधवारी नोंदणीसाठी आलेल्या मोलकरणींना मात्र नोंदीसाठी एकच टेबल असल्याने निराश होऊन परतावे लागले.दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी कामगार कल्याण कार्यालयात घरेलू मोलकरणींची नोंद केली जाते. आज तिसरा बुधवार असल्याने कामगार कल्याण कार्यालयात नोंद करण्यासाठी मोलकरणींनी एकच गर्दी केली होती. मात्र नोंदीसाठी एकच टेबल असल्याने मर्यादित वेळेत अल्प नोंदी झाल्या. परिणामी शेकडो मोलकरीण आणि घरेलू कामगार महिलांना रिकाम्या हाताने परतावे लागले. राज्य शासनाने घरेलू मोलकरणींकरिता १० हजार रूपयांच्या अनुदानाची योजना जाहीर केली होती. २०१४ पर्यंत ज्या महिलांचे वय ५५ ते ६० वर्षे आहे, अशांना हे अनुदान वितरित करण्यात येत आहे. त्यानंतरच्या नोंदी असलेल्या घरेलू मोलकरणी महिलांसाठीही प्रसूती अनुदानाची योजना आहे. याशिवाय इतरही शासकीय योजनासाठी ही नोंद महत्त्वाची ठरणार आहे.यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी बुधवारी सकाळपासून कार्यालयात गर्दी केली होती. मात्र नोंदीसाठी एकच टेबल असल्याने अनेक महिलांना नोंद न करता परतावे लागले. नोंदणीचे दिवस वाढवावे आणि तालुकास्तरावर नोंदणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी महिलांनी केली आहे. (शहर वार्ताहर)