शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात साडेचार कोटींचे वाटप

By admin | Updated: May 29, 2015 00:15 IST

महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या श्रावण बाळ, संजय गांधी निराधार व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील ...

नऊ हजार लाभार्थी : श्रावणबाळ, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ योजनापुसद : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या श्रावण बाळ, संजय गांधी निराधार व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत पुसद तालुक्यातील ९ हजार ४०६ लाभार्थ्यांना ४ कोटी ४३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.समाजातील गरीब, वृद्ध, विधवा, विकलांग, निराधार आदींना आर्थिक मदत करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. पुसद तहसील कार्यालयाच्यावतीने श्रावण बाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा निवृत्ती वेतन, राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन व राष्ट्रीय कुटुंब लाभ आदी विविध योजनांतर्गत ४ कोटी ४३ लाख ७१ हजार रुपयांचे वितरण २०१४-१५ या वर्षात करण्यात आले. पुसदचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, प्रभारी उपविभागीय अधिकारी दीपककुमार मीना, तहसीलदार भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनात समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. यामध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत तालुक्यात २०१४-१५ मध्ये ३ हजार ६२९ लाभार्थ्यांना १ कोटी ७५ लाख ४९ हजार २०० रुपये वार्षिक अनुदान म्हणून वाटप करण्यात आले, तर संजय गांधी निराधार योजनेंतर्गत २ हजार ६२६ लाभार्थी असून त्यांना १ कोटी ७१ लाख ८६ हजार ७०० रुपयांचे वार्षिक अनुदान वितरित करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत तालुक्यातील २ हजार ८८७ लाभार्थ्यांना ७२ लाख ७४ हजार २०० रुपयांचे वार्षिक अनुदान देण्यात आले. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ तालुक्यातील ४८ विधवांना मिळाला आहे. या अंतर्गत १ लाख ५ हजार २०० रुपयांचे वार्षिक अनुदान वाटप करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ ४९ अपंगांना मिळाला असून त्यांना १ लाख १६ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये एकूण १०७ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार या प्रमाणे एकूण २१ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तालुक्यात अद्यापही श्रावण बाळ योजनेंतर्गत ३४५ व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत १०२ प्रकरणे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून मंजुरी मिळताच या लाभार्थ्यांनाही पैसे वितरित होतील, माहिती तहसीलदार भगवान कांबळे यांनी लोकमतला दिली. शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांचा लाभ समाजातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका महसूल विभाग चांगल्यारितीने कार्यरत आहे. (प्रतिनिधी)