शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

सहज कर्ज देण्याचे पाॅम्पलेट वाटून अनेकांना घातला हजारोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

सचिन लक्ष्मण शिंदे (३२, रा. लक्ष्मीकृपा साेसायटी, अयाेध्यानगर, आर्णी राेड, यवतमाळ. मूळगाव हरू, ता. दारव्हा)  असे फसवणूक करणाऱ्या ठगाचे नाव आहे. त्याने साई मायक्राे ॲण्ड आदित्य फायनान्स या नावाने कंपनी काढली. या कंपनीच्या माध्यमातून काेणालाही काेणत्याही कंपनीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी बतावणी करणारे पाॅम्पलेट वाटले. हे पाॅम्पलेट घेऊन आलेल्या व्यक्तीला प्राेसेसिंग फीमध्ये काही टक्के सवलत देण्याचे आमिष दिले.

ठळक मुद्देपांढरकवडा पोलिसांनी उघड केला अजब फंडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  फसवणुकीसाठी काेण काय शक्कल लढवेल याचा नेम नाही. यवतमाळातील एका ठगाने चक्क काेणालाही सहज कर्ज मिळवून देताे याचे पाॅम्पलेट वाटून प्रचार केला. यातून अनेकांना हजाराेंचा गंडा घातला. हा प्रकार पांढरकवडा पाेलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला. आता पाेलीस फसवणूक झालेल्यांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन करत आहे. सचिन लक्ष्मण शिंदे (३२, रा. लक्ष्मीकृपा साेसायटी, अयाेध्यानगर, आर्णी राेड, यवतमाळ. मूळगाव हरू, ता. दारव्हा)  असे फसवणूक करणाऱ्या ठगाचे नाव आहे. त्याने साई मायक्राे ॲण्ड आदित्य फायनान्स या नावाने कंपनी काढली. या कंपनीच्या माध्यमातून काेणालाही काेणत्याही कंपनीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी बतावणी करणारे पाॅम्पलेट वाटले. हे पाॅम्पलेट घेऊन आलेल्या व्यक्तीला प्राेसेसिंग फीमध्ये काही टक्के सवलत देण्याचे आमिष दिले. प्रत्येकाकडून त्याने ६५० रुपये इतकी प्राेसेसिंग फी घेतली. ज्यांना तातडीने कर्ज हवे त्यांच्याकडून ४ हजार ५०० ते ६ हजार ५०० रुपये राेख घेतले. कर्ज मंजूर केले की एसएमएस येईल अशी बतावणी केली. ज्यांनी वाट पाहून एसएमएस आला नाही. अशांनी शिंदेच्या तथाकथित कंपनी कार्यालयात चकरा मारल्या. अशांना सचिन शिंदे याने बाेगस धनादेश दिले. ज्या खात्यात पैसेच नाही, जे खातेच पूर्वीच बंद केले असे धनादेश देऊन फसवणूक केली. अनेकांना गंडा घातल्यानंतर तक्रारदारांची संख्या वाढताच सचिन शिंदे याने पाेबारा केला. मात्र त्याच्या या फसवणुकीमुळे पांढरकवडा येथील एका युवकाने आत्महत्या केली. याप्रकरणात पांढरकवडा पाेलिसांनी सचिनला अटक केली. तेव्हा त्याचे रॅकेट किती माेठे आहे हे उघड झाले. त्याच्यावर भादवि ४२०, ३४ आणि ३०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पांढरकवडा ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक हेमराज काेळी करत आहे. ज्यांची फसवणूक झाली अशांनी सचिन शिंदेविराेधात तक्रार द्यावी, असे आवाहन पाेलिसांनी सर्व नागरिकांना केले आहे.

आमिषापासून सावध राहण्याची गरज बेरोजगारी आणि कोरोनाच्या संकटकाळात सहज कर्ज देण्याचे आमिष अनेकजण दाखवित आहे. आर्थिक तंगीमुळे सुशिक्षित वर्गही अशा आमिषांना बळी पडून हातचे पैसे गमावत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजी