शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-प्रशासनाच्या गतिमानतेने जिल्ह्याला दिलासा

By admin | Updated: May 26, 2015 01:29 IST

जिल्ह्यात युती सरकार आणि प्रशासन प्रचंड गतीमान झाल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राजेश निस्ताने ल्ल यवतमाळ जिल्ह्यात युती सरकार आणि प्रशासन प्रचंड गतीमान झाल्याने सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वर्षानुवर्षे रखडलेली त्यांची कामे वेगाने मार्गी लागत आहेत. त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पहायला मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जनता दरबारांचा सपाटा लावला आहे. या दरबारांना जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून शेकडो तक्रारींचा पाऊसही पडतो आहे. सलग आठ ते दहा तास चालणाऱ्या या जनता दरबारात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर ‘आता आपली समस्या सुटणार’ याचा आनंद पाहायला मिळतो आहे. यापूर्वी पालकमंत्र्यांचे केवळ ध्वजारोहण आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांनाच दर्शन व्हायचे. या परंपरेला संजय राठोड यांनी फाटा दिला आहे. मंत्र्यांना आपल्या गृहजिल्ह्यातच पालकमंत्री म्हणून नेमण्याच्या युती सरकारच्या निर्णयाचा हा चांगला परिणाम पहायला मिळत आहे. जिल्ह्याला सचिंद्र प्रताप सिंग हे नवे जिल्हाधिकारी लाभले आहेत. त्यांनी आढावा बैठकांची जणू मोहिमच हाती घेतली. विशेष असे या बैठका ‘फॉर्मेलिटी’ नाहीत, तर रिझल्ट ओरिएंटेड ठरत आहेत. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच बैठकांचा फड अनुभवला. आतापर्यंत बँकर्स कमिटीच्या बैठकांना केवळ जिल्ह्याचे प्रमुख व्यवस्थापक उपस्थित राहत होते. मात्र यावेळी पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांच्या सर्व शाखा व्यवस्थापकांना बैठकीत बोलविले. पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट न गाठणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. पीक कर्ज न देणे हे क्राईम आहे, असे स्पष्ट करताना आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी मानवी संकट लादू नका असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांशी सन्मानाने बोला, त्यांचे समाधान करा अशा सूचना केल्या गेल्या. कर्ज वाटपाची उद्दीष्टपूर्ती न झाल्यास तुमची खैर नाही, अशी तंबीही या बँक व्यवस्थापकांना देण्यात आली. या बैठकीत अनेक व्यवस्थापकांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते एवढी ही बैठक गाजली.