शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड बीडीओ व ग्रामसेवकात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

तालुक्यातील ग्रामसेवक एम.जी. सगरुळे बुधवारी वैद्यकीय रजेचा पगार मिळण्यासंदर्भात पंचायत समितीत गेले होते. त्यांनी तेथील बाबू हाडसे यांना विचारणा केली. हाडसे यांनी सगरुळे यांना गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत ग्रामसेवक बीडीओंच्या कक्षात पोहोचले. तेथे बीडीओ जयश्री वाघमारे व ग्रामसेवक सगरुळे यांच्यात वाद झाला.

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : बीडीओंनी बेल फेकून मारली, शिवीगाळही केली

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील पंचायत समितीत गटविकास अधिकारी आणि एका ग्रामसेवकामध्ये बुधवारी वाद झाला. या वादातून आपल्याला शिवीगाळ करून बेल फेकून मारल्याचा आरोप ग्रामसेवकाने केला. या प्रकरणात ग्रामसेवक कर्मचारी संघटनेने गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.तालुक्यातील ग्रामसेवक एम.जी. सगरुळे बुधवारी वैद्यकीय रजेचा पगार मिळण्यासंदर्भात पंचायत समितीत गेले होते. त्यांनी तेथील बाबू हाडसे यांना विचारणा केली. हाडसे यांनी सगरुळे यांना गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत ग्रामसेवक बीडीओंच्या कक्षात पोहोचले. तेथे बीडीओ जयश्री वाघमारे व ग्रामसेवक सगरुळे यांच्यात वाद झाला. बीडीओंनी तुम्हाला समजत नाही का, मला का भेटले नाही, तुम्ही मुर्ख आहात का, लाज वाटत नाही का आदी प्रश्नांचा भडीमार केला. सोबतच संतापून बीडीओंनी आपल्याला बेल फेकून मारली. नंतर पुन्हा पाण्याची बॉटल फेकून मारण्यासाठी तीनदा उगारली. तसेच तुम्ही सीईओकडे जा पण तुम्हाला पगार भेटणार नाही, अशी तंबी दिली.या घटनेने आपले मानसिक खच्चीकरण झाल्याचा आरोप सगरुळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बुधवारीच निवेदन दिले. दरम्यान या वादात आता महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने उडी घेतली आहे. युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन बीडीओवर कारवाईची मागणी केली आहे. बीडीओकडून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी संवर्गावर नेहमी अन्याय केला जातो, असा आरोप युनियनने निवेदनातून केला. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक मस्के, वरिष्ठ सल्लागार राजेश साव, उमरखेड तालुकाध्यक्ष एस.पी. बोंडे व स्वत: मारोती सगरुळे उपस्थित होते.दरम्यान, या संदर्भात गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या भ्रमणध्वनी स्विच आॅफ येत होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.संबंधित बीडीओ यांची पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसोबतची वागणूक नेहमी वादग्रस्त आहे. त्या नेहमी ग्रामसेवकांवर दबाव तंत्राचा वापर करून आर्थिक सोईची कामे करून घेतात.- माणिक मस्के,जिल्हाध्यक्ष, म.रा. ग्रामसेवक युनियन

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती