शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

समित्याच बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:01 IST

जिल्हा परिषदेच्या समित्यांना अधिकारच नसेल, तर सर्व समित्याच बरखास्त करा,....

ठळक मुद्देसदस्य आक्रमक : जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समित्यांना अधिकारच नसेल, तर सर्व समित्याच बरखास्त करा, अशी आक्रमक भूमिका शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी घेतली. यामुळे बराच काळ सभेत वादंग झाले.शिक्षण सभापती नंदिनी दरणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा पार पडली. यात स्वाती येंडे यांनी सुरूवातीलाच अधिकारी चुकीचे मार्गदर्शन करून चुकीचो ठराव पारित करून घेतात, असा घणाघात केला. चुकीचे प्रोसीडींग लिहिले जात असून पुढील सभेत तेच इतिवृत्त मंजूर केले जात असल्याचा आक्षेप घेतला. अधिकारी कोणत्याही समस्येवर तो अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांना असल्याचे सांगून समितीची दिशाभूल करता, असा आरोपही स्वाती येंडे यांनी केला.यावरून सभेत वादंग झाले. सीईओंचे नाव घेऊन चुकीची माहिती देऊ नका, असा दम येंडे यांनी भरला. तसेच सभेचे शुटीेंग केले जात असून ते सीईओंना दाखवू अशा इशारा दिला. शिक्षण समितीला कोणताच निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, सर्व अधिकार सीईओंनाच असेल, तर समिती बरखास्तच करून टाका, अशी तोफ त्यांनी डागली. कोणत्याच समितींना अधिकार नसतील, सर्व अधिकार सीइोंकडेच असतील, तर सर्वच समित्या बरखास्त का करीत नाही, असा सवाल येंडे यांच्यासह सर्वच सदस्यांनी उपस्थित केला. यामुळे बुधवारची सभा वादळी ठरली.सभेत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर जर दोन शिक्षक असतील, तर तेथील एक शिक्षक जादा पटसंख्या असलेल्या शाळेवर पाठविण्याचा निर्णय झाला. सर्व शिक्षा अभियानातून जिल्ह्यातील ६१ शाळांना हॅन्डवॉश आणि स्वच्छता गृह बांधण्यासाठी प्रत्येकी एक लाख ७५ हजारांचा निधी देणे, तसेच जिल्ह्यातील ८८० विद्यार्थ्यांना तीन हजारांचा वाहतूक भत्ता देण्याचाही निर्णय झाला.दोन सत्रात शाळा भरणारजादा पटसंख्या असून वर्गखोल्या कमी असणाºया शाळा येत्या पाच दिवसांत दोन सत्रात सुरू करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. तसेच प्रत्येक सदस्याने आपल्या सर्कलधील प्रत्येकी एक शाळा आदर्श करण्याचा संकल्प केला. येत्या १५ दिवसांत दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णयही सभेत झाला.फौजदारीच्या तंबीवरून नाराजीजिल्ह्यातील कोणत्याही शाळांना कोणत्याही कारणांवरून पालकांनी कुलूप ठोकल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याची भूमिका सीईओंनी जाहीर केली. या भूमिकेला सर्वच सदस्यांनी विरोध दर्शविला. शिक्षक व मूलभूत सुविधांची वारंवार मागणी करूनही ते मिणत नसेल, तर पालकांनी नेमके काय करावे, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला.