शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

By admin | Updated: June 1, 2016 00:13 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या ...

यवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन निवड चाचणी कार्यशाळा येथे घेण्यात आली. सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयात आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळ नरवेलचे उपाध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. विलास सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आपत्ती आल्यास त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे कौशल्य आपल्यामध्ये विकसित करता आले पाहिजे. संकटाचा सामना करणारे सुजाण युवक निर्माण करणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे, असे प्रा.डॉ. विलास सपकाळ यावेळी म्हणाले. आपत्ती आल्यास प्रतिबंध कसा करता येईल आणि काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबतचे विचार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. घनश्याम दरणे यांनी मांडले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी मिनल जगताप यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. गैरसमज व अंधश्रद्धेमुळे साप कसे बळी जातात याबाबत सर्पदंश व प्रथमोपचार या विषयावर प्रा. श्याम जोशी, दिवाकर तिरमारे, आकाश पसले यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जिल्हाभरातील विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. प्रास्ताविक रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. कमलदास राठोड, संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. घनश्याम दरणे, आभार प्राचार्य डॉ. राजेंद्र उमरे यांनी मानले. यावेळी रासेयो क्षेत्रिय समन्वयक प्रा. अनिल काळबांडे, प्रा. माधुरी राखुंडे, प्रा. राचलवार, प्रा. रत्नदीप गंगाळे, प्रा. प्रदीप जयस्वाल, प्रा. बत्तलवार उपस्थित होते. (वार्ताहर)