दिग्रस शहर व तालुका बनला कोरोनाचा हॉट स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 05:00 IST2020-07-16T05:00:00+5:302020-07-16T05:00:02+5:30

एकूण कोरोनाबाधित नागरिकांपैकी २० जण उपचाराअंती बरे झाले. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आता ५९ जणांवर यवतमाळात उपचार सुरू आहे. तत्पूर्वी विठ्ठलनगर येथील एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याने एकूण दोन रुग्ण मृत्यू पावले आहे. यामुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत आहे.

Digras city and taluka became the hot spot of Corona | दिग्रस शहर व तालुका बनला कोरोनाचा हॉट स्पॉट

दिग्रस शहर व तालुका बनला कोरोनाचा हॉट स्पॉट

ठळक मुद्दे५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : २० नागरिक उपचाराअंती घरी परतले, एकूण ७९ बाधित रुग्ण'

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शहरासह तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. दर दिवशी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. बुधवारी सकाळी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र अद्याप प्रशासनाने त्याची अधिकृत घोषणा केली नाही. यातून दिग्रस शहर कोरोनाचे हॉट स्पॉट बनल्याचे दिसून येते.
गेल्या काही दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ७९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी २० जण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे तालुक्यात सध्या ५९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. त्यात शहरातील विठ्ठलनगर येथील एका ५५ वर्षीय व्यक्तचा यवतमाळ येथे बुधवारी मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याबाबत प्रशासनाने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. शहरातील काजीपुरा येथे २६, विठ्ठलनगर १७, घंटीबाबानगर एक, देवनगर दोन, बालाजीनगरी एक, बाराभाई मोहल्ला तीन, रूई एक, इसापूर चार, लाख (रायाजी) दोन, आरंभी एक आणि लायगव्हाण येथे एक अशा ७९ जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
एकूण कोरोनाबाधित नागरिकांपैकी २० जण उपचाराअंती बरे झाले. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आता ५९ जणांवर यवतमाळात उपचार सुरू आहे. तत्पूर्वी विठ्ठलनगर येथील एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याने एकूण दोन रुग्ण मृत्यू पावले आहे. यामुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत आहे. शहरातील चार परिसर यापूर्वीच प्रतिबंधित करण्यात आले आहे.

४४ नागरिक इसापूर येथे क्वारंटाईन
तालुक्यातील इसापूर येथे कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या संपर्कातील क्वारंटाईन व्यक्तींना ठेवले जात आहे. या सेंटरमध्ये तालुक्यातील ४४ नागरिकांना सध्या क्वारंटाईन केले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार राजेश वझीरे यांनी केले आहे.

Web Title: Digras city and taluka became the hot spot of Corona