शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

धनगर म्हणतात, घेणारच आरक्षण

By admin | Updated: August 3, 2014 00:23 IST

धनगर समाजाची आरक्षण मिळविण्यासाठी तर आदिवासी बांधवांची आरक्षण वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. शनिवारी या दोनही समाजाने काढलेल्या मोर्चावरून ‘ आरक्षण घेणारच’ आणि ‘देणार नाही’ ही भूमिका

यवतमाळ : धनगर समाजाची आरक्षण मिळविण्यासाठी तर आदिवासी बांधवांची आरक्षण वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. शनिवारी या दोनही समाजाने काढलेल्या मोर्चावरून ‘ आरक्षण घेणारच’ आणि ‘देणार नाही’ ही भूमिका तिव्रेतेने मांडण्यात आली. दोनही मोर्चे एकाच ठिकाणी पोहोचले तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाला मोर्चेकऱ्यांचा वेढा पडला होता. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’धनगर समाज बांधव पोस्टल मैदानात एकत्र आले होते. कपाळी पिवळा मळवट, हाती पिवळे ध्वज, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष, हाती घेतलेले मागण्यांचे फलक, मेंढ्या, घोडे आणि पारंपरिक पेहराव असे धनगर समाज बांधवांच्या धिक्कार मोर्चाचे चित्र होते. केंद्र शासनाने धनगर समाजाला आरक्षणाच्या यादीत घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, महाराष्ट्रातील मंत्र्यांंनी विरोध केला. समाजाला आरक्षण देण्यात होत असलेल्या विरोधाचा निषेध नोंदविण्यात आला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केल्यानंतर एलआयसी चौकात जाहीर सभा घेण्यात आली. सभेला संबोधित करताना संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या धोरणावर टीका केली. एसटीच्या सवलती मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे समितीचे सचिव संजय शिंदे पाटील यांनी सांगितले. आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत धडा शिकवून घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन सदबाराव मोहटे यांनी केले. धनगरांची एकजूट कायम राहिल्यास स्थानिक नेत्यांना गावपातळीवरची निवडणुकही जिंकता येणे अशक्य आहे, असे मत डॉ.विकास महात्मे यांनी व्यक्त केले. आम्ही आमचा हक्क मागतो आहे. आरक्षण हा आमचा हक्क आहे. ते मिळेपर्यंत लढत राहू, असे रेणू संजय शिंदे म्हणाल्या. धनगर या शब्दाचा धनगड असा अपभ्रंश झाल्याने धनगर समाजाला आजपर्यंत एसटीचे आरक्षण मिळाले नाही, असे डॉ.संदीप धवने म्हणाले. केंद्राने सुचविल्यानंतरही महाराष्ट्र शासन धनगर समाजाला आरक्षण देण्यास टाळत असल्याचा आरोप बळवंतराव नाईक यांनी केला. ताई कोरटकर, श्रीधर मोहोड, सुरेश शिंदे पाटील, बाळासाहेब शिंदे, अशोक मोटके, जीवन देवकते, पांडुरंग खांदवे, अविनाश जानकर, गजानन डोमाळे, पिंटू शिंदे, आशीष मासाळ, डॉ.रमेश महानूर, दीपक डोमाळे, मनोज गोरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. (शहर वार्ताहर)