शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाख खर्चूनही वसंतनगर येथील नागरिक तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST

महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये  विहीर  पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. ग्रामपंचायत कोरोना काळात गृहकर भरल्याशिवाय पाणी देण्यास तयार नाही. ५० टक्के गृहकर व ५०० रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय नळ जोडणी होणार नाही.

ठळक मुद्देगृहकर भरल्याशिवाय पाणी नाही

सविता घुगरेलोकमत न्यूज नेटवर्कपोफाळी : मे हिटच्या तडाख्यात उमरखेड तालुक्यातील पोफाळीच्या वसंतनगर परिसरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सुमारे १८ लाख रुपये खर्च करून पाण्याची व्यवस्था असताना, ग्रामपंचायतीने गृहकर भरल्याशिवाय पाणी मिळणार नसल्याचा फतवा काढल्यामुळे नागरिकांवर पाणी असूनही पाण्याविना तडफडण्याची वेळ ओढावली आहे.२०१७-१८ मध्ये येथील साखर कारखाना बंद पडला आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. पाण्याची गरज  पाहून या परिसरात सहा ठिकाणी कूपनलिका घेण्यात आल्या. त्यातील तीनला पाणीच नाही. उर्वरित तीन एप्रिलपर्यंत चालतात, नंतर कोरड्या पडतात. या तिन्ही कूपनलिका एकाच भागात आहेत. त्यामुळे इतर भागात नागरिकांना फायदा होत नाही.महाराष्ट्र ग्रामीण योजनेंतर्गत आठ लाख रुपये खर्च करून २०१९ मध्ये  विहीर  पूर्ण करण्यात आली. विहिरीवरून १४व्या वित्त आयोगातून १० लाख रुपये खर्च करून वसंतनगर येथे पाइपलाइन टाकण्यात आली. २०२० मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही. ग्रामपंचायत कोरोना काळात गृहकर भरल्याशिवाय पाणी देण्यास तयार नाही. ५० टक्के गृहकर व ५०० रुपये अनामत रक्कम भरल्याशिवाय नळ जोडणी होणार नाही.  या परिस्थितीतही ४० जणांनी अनामत रक्कम जमा केली. २० जणांनी गृहकर भरला आहे. अनेक नागरिकांकडे मात्र कराचा भरणा करण्यासाठी पैसे नाहीत.

४० जणांचा पाणीपुरवठा झाला सुरळीतकारखाना कॉलनीतील  ४० जणांनी अनामत रक्कम जमा केली. त्यांना पाणीपुरवठा सुरू झाला. हा परिसर औद्योगिक क्षेत्रात येतो. त्यामुळे नागरिक गृहकर भरत नाही. त्यांचा कर आत्तापर्यंत कारखाना प्रशासन भरत होते. आता त्यांनी केवळ ५०० रुपये अनामत रक्कम जमा करून पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. मात्र, उर्वरित नागरिक पाण्यापासून वंचित आहे.  

वसंतनगर येथील नळ  योजनेसाठी नागरिकांनी ग्रामपंचायतीत ५० टक्के गृहकर व  अनामत ५०० रुपये रक्कम भरून  सहकार्य करावे. त्यामुळे गावाचा विकास साधता येईल.- रेखा क्षीरसागर, सरपंच, पोफाळी

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई