शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कळंब खविसंवर देशमुख गटाचे वर्चस्व

By admin | Updated: January 16, 2017 01:13 IST

तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सहकारी खरेदी विक्री संघावर प्रवीण देशमुख गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले.

कळंब : तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सहकारी खरेदी विक्री संघावर प्रवीण देशमुख गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले. या गटाने सर्व १५ जागा जिंकल्या. सदर संस्थेची निवडणूक रविवारी होवून लगेच मतमोजणी घेण्यात आली. विजयी उमेदवारांमध्ये संलग्न सहकारी संस्था मतदार संघातून विद्यमान अध्यक्ष दत्तकुमार वासुदेव दरणे, मंगेश प्रभाकर होरे, सचिन चिंतामण शेंडे, प्रदीप गुणवंत झोटिंग यांचा समावेश आहे. वैयक्तिक मतदार संघातून प्रवीण अण्णाजी खडसे, अरुण नथ्थोबाजी लांडगे, रवींद्र अनिल मांडवकर, शंकर झुंगरु निकोडे, नितीन गणेश पराते, विठ्ठल अंबादास साळवे यांचा विजय झाला आहे. महिला राखीव मतदार संघातून रेखा प्रकाश भिसे, आशा झन्नाजी नंदुरकर या अविरोध निवडून आल्या. इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून केशव पांडुरंग नागतोडे हे अविरोध निवडून आले. विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून विद्यमान उपाध्यक्ष सुदाम जेमाजी पवार हे अविरोध निवडून आले. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून सुरेश वामनराव चिंचोळकर यांची अविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा.वसंत पुरके गटाने आश्चर्यकारकरीत्या सर्वच्या-सर्व अर्ज परत घेतले. त्यामुळे एकतर्फी ताबा मिळविण्याचा प्रवीण देशमुख गटाचा मार्ग मोकळा झाला होता. आजच्या निकालानंतर तिसऱ्यांदा प्रवीण देशमुख गटाने खरेदी विक्री संघावर विजयी हॅटट्रिक साधली. उमेदवारांच्या विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. या निवडणुकीत अशोक माणिकलाल जयस्वाल, अशोक मोतीराम उमरतकर व दिनकर चंद्रभान देवतळे हे तिनच अपक्ष रिंगणात होते. त्यांचा पराभव झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.टी. वडेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.एम. नाईक यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)