शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

संथारावरील बंदी हटविण्याची मागणी

By admin | Updated: August 26, 2015 02:41 IST

प्राचीन काळापासून जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. या प्राचीन परंपरेवर राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी आणली.

पांढरकवडा : प्राचीन काळापासून जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. या प्राचीन परंपरेवर राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी आणली. हा निर्णय जैन धर्मीयांसाठी अयोग्य आहे. त्याचा पुर्नविचार करून ही बंदी हटविण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र पितलीया यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.भगवान महावीरांच्या पूर्वीपासूनच्या काळात जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जैन धर्मीयांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. संथारा व्रताची तुलना आत्महत्या व सती प्रथा, यांच्याशी करणे अयोग्य आहे. कोणतााही व्यक्ती निराशा, कुंठा, मानसिक असंतुलन व इतर प्रतिकूल परिस्थितीत आत्महत्या करतो. सती प्रथेत पतीच्या निधनानंतर पत्नी शोककळेत आपले जीवन संपविते. मात्र संथारा व्रत परंपरेत कोणत्याही स्वस्थ व्यक्तीला संथारा व्रत दिले जात नाही. आजारपणात एखाद्या व्यक्तीची शारीरिक क्रिया एकदम मंद झाली असेल, तसेच आहार, पाणी बंद झाले असेल, ते काहीही ग्रहण करीत नसेल, तरच त्या व्यक्तीच्या इच्छेने व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या सहमतीने संथारा व्रत दिले जाते. संथारा व्रत अनिवार्य नसते. संथारा घेणाऱ्या व्यक्तीची धार्मिक भावना मोक्ष प्राप्त करण्याची असते. यामुळे संथारा व्रताला अन्य कोणत्याही क्रियेशी जोडणे योग्य नाही. राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय जैन धर्मात आंतरिक हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)