शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र इंद्रियासक्ती मानवाला ध्येयापासून दूर नेते

By admin | Updated: August 18, 2014 23:49 IST

काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मानवाचे शत्रू आहे. काम हा विषयासक्ती वाढवून मानवाला भलतीकडेच घेऊन जातो. तेव्हा यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तुलसी-रामायणाच्या अभ्यासक

उमरखेड : काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मानवाचे शत्रू आहे. काम हा विषयासक्ती वाढवून मानवाला भलतीकडेच घेऊन जातो. तेव्हा यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तुलसी-रामायणाच्या अभ्यासक आणि राम कथाकार सुश्री आशाश्री दाणी यांनी येथे केले. हनुमान मंदिर संस्थान आणि रामभक्त मंडळींच्यावतीने आयोजित श्रीराम कथा पर्वातील प्रथम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. श्रावण मास व पर्यावरण संतुलनासाठी आयोजित करण्यात आलेले हे कथापर्व २३ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. आपल्या अभ्यासपूर्ण आणि सुश्राव्य वाणीतून आशाश्रींनी श्रीराम कथा भाविकांना सांगितली. मानवाचे शरीर हाडामांसाचे एक गाठोडे आहे. तीव्र इंद्रियासक्ती आणि भोगलालसेमुळे मानव आपल्या मूळ स्वरूपाला विसरुन प्रपंचरुपी नदीमध्ये सतत गटांगळ्या खातो त्यामुळे तो परमार्थी ऊर्जेला मुकत चालला आहे.मानवाने सत्कर्मे आचरली आणि भोगलालसेपासून इंद्रियांना आवर घातली तर नराचा नारायण होतो.सुख दु:खापासून मुक्ती मिळू शकते. तुलसी-रामायणाच्या कथेचा हाच उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येकाने रामकथा आवर्जून ऐकली पाहिजे. तुलसी-रामायणाचा जन्मच मुळी आसक्ती विरोधातून झाला आहे. पत्नीच्या प्रेमामुळे आसक्त झालेल्या तुलसीदासांना ग्लानी आली होती. अहोरात्र पत्नीचे चिंतन व तिच्या विषयीच्या तीव्र आसक्तीने सैरभैर झालेल्या तुलसीदासांना त्यांच्या पत्नीनेच दिव्य उपदेश केला आणि पारलौकिक वाटेवर चालण्यास भाग पाडले, असे त्यांनी सांगितले. रामकथा श्रवण करण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)