शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उतरती कळा

By admin | Updated: September 29, 2014 00:53 IST

तांत्रिक शिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. अनेक अभ्यासक्रम बंद होत आहेत.

निश्चल गौर - डोंगरखर्डातांत्रिक शिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. अनेक अभ्यासक्रम बंद होत आहेत. शिवाय काही ठिकाणच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची वाणवा आहे, तर काही ठिकाणी वेतनातही अनियमितता आहे. या समस्यांमधून आयटीआयला बाहेर काढण्यासाठी ठोस प्रयत्नाची गरज आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय फायद्याचा आहे. न परवडणारी शेती, कामाची टंचाई आदी कारणांमुळे हा विद्यार्थी सैरभैर आहे. हाताला काम नसल्याने व्यसनाधिनतेचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी गावाची शांतता व सुव्यवस्थाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवक उद्योगात गुंतून असला तर ही परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते. मात्र औद्योगिक शिक्षणाकडेच शासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. येथून जवळच असलेल्या अंतरगाव येथील आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षणासह इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. विशेष म्हणजे, शिवणकर्तन आणि ड्रायव्हर कम मेकॅनिक हे दोन व्यवसाय शिक्षण बंद झाले आहेत. ड्रायव्हर कम मेकॅनिक हा अभ्यासक्रम शासनस्तरावरून बंद करण्यात आला आहे. या प्रशिक्षण संस्थेत शिवणकर्तन, फिटर, लिपिक आणि प्रकल्प अधिकारी ही चार पदे रिक्त आहेत. फिटर व्यवसाय शिक्षणासाठी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत केवळ वीजतंत्री आणि फिटर याच विषयाचे शिक्षण दिले जाते. सहा महिन्याचा व्यवसाय शिक्षण हा अभ्यासक्रम बंद झाला आहे. हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावा, अशी मागणी अंतरगावचे सरपंच बाबाराव पंधरे आदींनी केली आहे.