बोरीमहलच्या शेतकऱ्याने तयार केले डवरा यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:02+5:30

इलेक्ट्रानिक्स डवरा यंत्र बनविण्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. तीन व दीड फुटापर्यंत या मशीनने डवरा चालविता येतो. पेरणी, फवारणी एवढेच नाही तर खत टाकणेही या यंत्राने करता येते. जे काम बैलजोडीने प्रती एकर एक हजार २०० रुपयात होते, तेच काम तब्बल तीन एकर शेत डवरणे एका माणसाच्या मजुरीसह ५५० रुपयात होते. त्यांचे हे डवरा यंत्र पाहण्याठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतात भेटी देत आहे.

Davara machine made by a farmer of Borimahal | बोरीमहलच्या शेतकऱ्याने तयार केले डवरा यंत्र

बोरीमहलच्या शेतकऱ्याने तयार केले डवरा यंत्र

Next
ठळक मुद्देटाकाऊ वस्तूचा उपयोग, कमी खर्चात जास्त काम, ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कमालीचे औत्सुक्य

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : तालुक्याच्या बोरीमहल येथील एका युवा शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूपासून शेतात चालणारे डवरा यंत्र बनविले आहे. या यंत्रामुळे कमी खर्चात जास्त काम करता येते. हेमंत चुनारकर या युवकाने हे यंत्र तयार केले आहे.
इलेक्ट्रानिक्स इंजिनियरची पदवी प्राप्त केलेल्या हेमंतने काही दिवस कंपनीत काम केले. आता गावामध्ये शेतीचे काम करीत आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करुन कमी श्रम आणि खर्चात शेती कशी करता येईल, यावर तो संशोधन करत आहे. याचाच एक भाग म्हणून त्याने हे डवरा यंत्र तयार केले आहे. हे यंत्र बनविण्यासाठी त्याला वडील विठ्ठल चुनारकर यांनी मदत केली. भाजपच्या महिला सरचिटणीस वैष्णवी चिमुरकर यांचे त्याला प्रोत्साहन होते.
इलेक्ट्रानिक्स डवरा यंत्र बनविण्यासाठी १५ हजार रुपये खर्च आला. तीन व दीड फुटापर्यंत या मशीनने डवरा चालविता येतो. पेरणी, फवारणी एवढेच नाही तर खत टाकणेही या यंत्राने करता येते. जे काम बैलजोडीने प्रती एकर एक हजार २०० रुपयात होते, तेच काम तब्बल तीन एकर शेत डवरणे एका माणसाच्या मजुरीसह ५५० रुपयात होते. त्यांचे हे डवरा यंत्र पाहण्याठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतात भेटी देत आहे. शेतीच्या कामासाठी खर्चाचा भार शेतकऱ्यांवर वाढत आहे. अशावेळी हेमंत चुनारकर याने तयार केलेले डवरा यंत्र बचतीसाठी मार्ग देणारा ठरला आहे. शिवाय हेमंतच्या कल्पकतेला बळ मिळाले आहे.

यंत्रासाठी केल्या भंगारातून वस्तू खरेदी
डवरा यंत्र बनविण्यासाठी ७० टक्के साहित्य भंगारातून खरेदी करण्यात आले. ३० टक्के साहित्य नवीन घेतले. हे यंत्र पूर्णपणे पेट्रोलवर चालणारे आहे. एक एकरासाठी केवळ एक लिटर पेट्रोल खर्ची होते. विशेष म्हणजे एका दिवसात तीन ते चार एकर जमीन सहज डवरली जाऊ शकते. कमी श्रमामध्ये हे काम पूर्ण करता येते.

Web Title: Davara machine made by a farmer of Borimahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.