शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

पाच मॉडेल कोर्टांमध्ये दारव्हाचा समावेश

By admin | Updated: October 3, 2015 02:25 IST

राज्यात पाच मॉडेल कोर्ट निर्माण करण्याचा निर्णय झाला होता.

भूषण गवई : नवीन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटनदारव्हा : राज्यात पाच मॉडेल कोर्ट निर्माण करण्याचा निर्णय झाला होता. त्यामध्ये दारव्हा येथील न्यायालयाचा समावेश करण्यात आला. ही दारव्हा तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण गवई यांनी केले. भूषण गवई यांच्या हस्ते दारव्हा येथील न्यायालयीन इमारतीचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप शिरासाव होते. व्यासपिठावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. रवी कृष्णराव देशपांडे, पालकमंत्री संजय राठोड, दारव्हा येथील जिल्हा न्यायाधीश - १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश कीर्तीकुमार सेदाणी, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ आशीष देशमुख, तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ शैलेश बल्लाळ, सचिव अ‍ॅड़ मनोज कावळे आदींची उपस्थिती होती. न्या. भूषण गवई पुढे म्हणाले, सध्या येथे मॉडेल कोर्टची इमारत झाली. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा अद्याप पुरविण्यात आल्या नाही. केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होताच मॉडेल कोर्ट ही संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा लवकरच सुरू करण्यात येईल. राज्यातील पाच मॉडेल कोर्टमध्ये दारव्हाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये याठिकाणी वकिलीचा व्यवसाय केलेले आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयात रजिस्टार असलेले दारव्ह्याचे सुपूत्र राजेश लढ्ढ, अ‍ॅड़ आशीष देशमुख यांच्या नावाचा गवई यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. यावेळी बोलताना पालकमंत्री राठोड यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात न्यायव्यवस्था मोठा आधारस्तंभ आहे. चारही स्तंभामध्ये न्यायव्यवस्था मोठा स्तंभ असल्याचे ते म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांचेही मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाला अ‍ॅड़ एस.बी. उके, अ‍ॅड़ एस.ए. कथले तसेच न्यायाधीश, वकील, कर्मचारी, दारव्हा वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)