शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या अंधारात गुप्तधनासाठी यवतमाळ जिल्ह्यात ‘व्हीआयपी’ टोळीचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 13:07 IST

Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यात सावळी सदोबा येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात गुप्तधनासाठी चक्क जेसीबी लावून रात्रीच्या अंधारात खड्डे केले जात आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

ठळक मुद्देखड्डेच खड्डे चोहीकडे, गेले पोलीस कुणीकडे सावळीच्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात खोदकाम

लोकमत न्यूज नेटवर्क

 यवतमाळ  : पूर्वजांच्या पुण्याईवर ऐश करणारे अनेक आयतोबा आपल्या अवतीभोवती दिसतात. मात्र काही जण आयत्या श्रीमंतीसाठी चक्क गुन्हेगारी आणि जादूटोण्याच्याही आश्रयाला गेले आहे. त्याचाच प्रत्यय आर्णी तालृुक्यात वारंवार येतोय. सावळी सदोबा येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात गुप्तधनासाठी चक्क जेसीबी लावून रात्रीच्या अंधारात खड्डे केले जात आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.

जुन्या काळातील राजा महाराजांच्या काळातील धन जमिनीत गाडलेले असावे, या भ्रमातून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी सावळी सदोबा येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरावर डोळा ठेवून आहे.

रविवारी रात्री देखील पौर्णिमेचा मुहूर्त हेरुन गुप्तधन शोधणाऱ्या टोळक्याने येथे खोदकाम केले. मात्र त्यांच्या हाती काही लागले का याबाबत साशंकता आहे. हे खड्डे परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र सध्या तरी या प्रकरणात पुढे काहीच झाले नाही.

 

यापूर्वीही जेसीबीने खड्डे

साधारण तीन महिन्यापूर्वी याच सिद्धेश्वर मंदिर परिसरात थेट नागपुरातून काही उच्चभ्रू लोक महागड्या गाड्यांमधून येथे रात्रीच्या वेळी दाखल झाले होते. त्यांनी जेसीबी मशीन लावून येथे खड्डा केला. परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र पोलिसांनी या लोकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. सावळी सदोबा प्रमाणेच आर्णी तालुक्यात सोनारी, सोनेगाव, दातोडी येथेही गुप्तधनासाठी वारंवार खोदकाम केले जात आहे.

 

मंदिरच ‘टार्गेट’ का ?

सावळी सदोबा येथे पुरातन हेमाडपंथी मंदिर होते. त्या मंदिराचे आता मोठे बांधकाम झाले आहे. जुन्या काळात एका शेतकऱ्याने मंदिराला १८ एकर जमीन दान दिली. ही जमीन मक्त्याने देऊन त्या पैशातून मंदिरात सप्ताह साजरा केला जातो. याच जमिनीत गुप्तधन असल्याचा अनेकांचा भ्रम आहे. मात्र मक्तेदार शेतकऱ्यांच्या दक्षतेमुळे खोदकाम करणाऱ्यांचे मनसुबे उधळले जात आहे. जुन्या काळात येथे मोठे गाव असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे येथील जमिनीत खजिना असल्याचाही भ्रम आहे.

 

हे सिद्धीप्राप्त देवस्थान असल्याचा लोकांचा समज आहे. त्यामुळेच त्याला सिद्धेश्वर देवस्थान म्हटले जाते. येथे गुप्तधन असल्याच्या हव्यासातून वारंवार खोदकाम केल्याचे प्रकार दिसून येत आहे. यावर बंदोबस्त लावण्याची गरज आहे.

- प्रल्हादराव जगताप पाटील, शेतकरी सावळी सदोबा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी