शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या शुभेच्छापत्रांची क्रेझ मंदावली

By admin | Updated: October 15, 2014 23:25 IST

दिवाळी सणाला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे़ यानिमित्त बाजारात विविध साहित्य व शुभेच्छापत्रांची दुकाने सजते. मात्र आता मोबाईलच्या जमान्यात एसएमएसचा काळ असल्याने शुभेच्छापत्रांची क्रेझ

वणी : दिवाळी सणाला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे़ यानिमित्त बाजारात विविध साहित्य व शुभेच्छापत्रांची दुकाने सजते. मात्र आता मोबाईलच्या जमान्यात एसएमएसचा काळ असल्याने शुभेच्छापत्रांची क्रेझ मंदावली आहे.पूर्वी सणानिमित्त विविधरंगी शुभेच्छापत्रे खरेदी करून ती आप्त-स्वकीय, मित्र-मैत्रीणींना पाठविण्यात येत होत्ी. दिवाळीला तर शुभेच्छापत्रांच्या दुकानात ग्राहकांची प्रचंड वर्दळ दिसत होती़ मात्र आता मोबाईलच्या वापरामुळे एसएमएसच्या आगमनाने शुभेच्छापत्रांची के्रझ कमी होताना दिसत आहे़ आता केवळ मोजक्याच युवकांचा शुभेच्छापत्रांकडे कल असतो. नक्षीदार कलाकुसरीने तयार शुभेच्छापत्रांचे युवकांमधील आकर्षण दिवसेंदिवस कमी होत आहे़ केवळ ‘व्हॅलेंन्टाईन डे’लाच शुभेच्छापत्रांचा खप मोठ्या प्रमाणात होत असल्याचे एका व्यावसायीकाने सांगितले.आता मोबाईलवर किमान एक रूपयामध्ये शुभेच्छांचा एसएमएस पाठविता येतो. त्यामुळे सर्वांनीच आता एसएमएसला पहिली पसंती दिली आहे़ कमी खर्चात जास्त जणांना दिवाळीच्या शुभेच्छा जात असल्याने एसएमएसची के्रझ प्रचंड वाढली आहे़ तसेच सोशल नेटवर्क, फेसबुकवर तर दररोज अ‍ॅडव्हांस शुभेच्छांचा वर्षाव होतो. फेसबुकवर एसएमएसचे दर लागत नसल्याने सवर््च फेसबुकवर आपापल्या पध्दतीने शुभेच्छा देतात. शुभेच्छापत्रांची डिझाईन मोबाईलवर तयार करून किंवा इंटरनेटवरील शुभेच्छापत्र डाऊलनोड करून युवक ते फेसबुकवर अपलोड करतात. त्यातूनच सर्व फेसबुक फे्रन्ड्सना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात येतात. त्यामुळे आपसुकच शुभेच्छापत्रांना अखेरची घरघर लागल्याचे दिसून येत आहे़पूर्वी शुभेच्छापत्रांना मोठ्या प्रमाणात मागणी होती़ ५०० रूपयांच्यावर बाजारात ती उपलब्ध आहे़ आताही विविध कलाकुसरींची शुभेच्छापत्रे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे़ आधुनिक युगानुसार लाईट्स व दीपावलीचे संगीतही शुभेच्छापत्रात वाजू लागले आहे़ मात्र तरीही या दुकानांकडे ग्राहकांची गर्दी कमीच दिसून येत आहे़ त्यामुळे भविष्यात शुभेच्छापत्र राहणार की हद्दपार होणार, हे आता सांगणे कठीण झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)