शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

४६ हजार हेक्टरवर संकट

By admin | Updated: August 19, 2014 23:59 IST

पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ४६ हजार हेक्टरातील कपाशी, सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहेत. ५४ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी खरिपात पेरणी झाली. त्यापैकी जेमतेम आठ हजार

पावसाची दडी : केवळ ४० टक्के पाऊस, कपाशी, सोयाबीन करपतेयवणी : पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ४६ हजार हेक्टरातील कपाशी, सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहेत. ५४ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी खरिपात पेरणी झाली. त्यापैकी जेमतेम आठ हजार हेक्टरातील पिके तूर्तास समाधानकारक असली, तरी पाऊस न आल्यास त्यांचीही स्थिती नाजूक होणार आहे. मृग नक्षत्रापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दणका दिला आहे. मध्यंतरी तुरळक पाऊस आल्याने शेती पिकांना जीवनदान भेटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा गेल्या तीन हप्त्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. जुलै महिन्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलेलेले हास्य आता लोप पावत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. पहिल्यांदा बियाणे पेरल्यानंतर मोड आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. तशाही स्थितीत तालुक्यात यावर्षी ४५ हजार ४९४ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. सोबतच आठ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी पूर्ण केली होती. तथापि पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवरवर दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. कपाशी सोबतच शेतकऱ्यांना २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार पेरणी करावी लागली होती.तालुक्यात खरीपात ४५ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. शेतकऱ्यांनी घरच्या लक्ष्मीच्या अंगावरील दाग-दागिने, शेती गहाण ठेवून कर्ज काढले. त्यानंतर कशीबशी दुबारच नव्हे, तर तिबार पेरणी केली. मात्र आता पावसाने पुन्हा त्यांना चिंताक्रांत केले आहे. गेल्या तीन हप्त्यांपासून पाऊस नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. आधी दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर शेतकऱ्यांना महागडे रासायनिक खत, महागडे किटकनाशक खरेदी करावे लागले. सोबतच निंदण, डवरणीचा खर्च करावा लागला. मजुरांना बाहेर गावावरून आॅटोने आणावे लागले. या सर्व त्रासापासून मुक्तता होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेती पिकांची जिवापाड जोपासना केली. मात्र आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहे. कर्ज कसे फेडावे, घरातील कार्य कशी करावी, प्रपंच कसा चालवालवा, या प्रश्नांनी त्यांना हैराण केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)