शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरवरून आलेल्या इसमाविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

नागपुरपासून वणीपर्यंत सर्व सुरक्षा यंत्रणेला भेदत वणीत पोहोचलेल्या एका इसमाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सदर इसम नागपूर येथून वणीपर्यंत पायी आल्याचे सांगण्यात येते. तो स्थानिक लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी आहे. ही बाब परिसरातील रहिवाशांना माहित पडताच याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्याच्या घरी जाऊन त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला.

ठळक मुद्देवणी पोलिसांची कारवाई : हातावर शिक्का असूनही मुक्तसंचार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नागपुरपासून वणीपर्यंत सर्व सुरक्षा यंत्रणेला भेदत वणीत पोहोचलेल्या एका इसमाविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे सदर इसम नागपूर येथून वणीपर्यंत पायी आल्याचे सांगण्यात येते. तो स्थानिक लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी आहे. ही बाब परिसरातील रहिवाशांना माहित पडताच याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्याच्या घरी जाऊन त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला. परंतु गेल्या दोन दिवसांपासून तो हातावर शिक्का असतानाही परिसरात मुक्तपणे फिरत होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. यासंदर्भात पुन्हा पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी सदर इसमाविरूद्ध भादंवि १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल केला. तसेच त्याला घराबाहेर न पडण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी पोलीस यंत्रणेसह वणी ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.कमलाकर पोहे, डॉ.भालचंद्र आवारी यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने सदर इसमाच्या घरी भेट देऊन त्याला व त्याच्या कुटुंबियाला घराबाहेर न पडण्याबाबत पुन्हा एकदा ताकीद दिली. होम क्वारंटाईनचा शिक्का असुनही घराबाहेर फिरणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची वणी शहरातील ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या