शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दरवर्षी दिली जातात. समग्र शिक्षातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपरिषदेच्या शाळा, शासकीय शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरतात. गेल्या वर्षी १७ लाख ३ हजार १२ पाठ्यपुस्तके जिल्ह्याला मिळाली होती.

ठळक मुद्देयाच महिन्यात येणार : बालभारतीने मागविली साठवणुकीच्या जागांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संकटामुळे पुढील शैक्षणिक सत्र केव्हा सुरू होणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र नव्या सत्रासाठी नवी कोरी पुस्तके छापून तयार आहेत. विशेष म्हणजे, ही पुस्तके याच महिन्यात जिल्ह्यात दाखल होणार आहेत. यंदा जिल्ह्यातील २ लाख ८८ हजार २७० विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी जिल्ह्याने नोंदविली आहे.जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दरवर्षी दिली जातात. समग्र शिक्षातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपरिषदेच्या शाळा, शासकीय शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी पात्र ठरतात. गेल्या वर्षी १७ लाख ३ हजार १२ पाठ्यपुस्तके जिल्ह्याला मिळाली होती. यंदा त्यापेक्षाही अधिक पुस्तके मिळण्याची शक्यता आहे. कारण २०१८-१९ या सत्राच्या यू-डायस आकडेवारीनुसार विद्यार्थीसंख्या गृहित धरून बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यासाठी सोळाही पंचायत समितीस्तरावरून आकडेवारी घेण्यात आली आहे. त्यात मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, बालभारतीच्या पुण्यातील मुख्य डेपोतून पुस्तके रवानाही झाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अमरावतीच्या डेपोतून ही पुस्तके मिळणार आहेत. त्यासाठी सोळाही तालुक्याच्या ठिकाणी पुस्तकांची साठवणूक करण्याची ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे. मेअखेरीस या सोळा ठिकाणी थेट अमरावतीतून पुस्तके पोहोचणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.एकात्मिक पुस्तकासाठी दारव्हा तालुक्याची निवडविद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदा बालभारतीने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक’ प्रकल्प सुरू केला आहे. यात एका वर्गाचे सर्व विषय मिळून एकच पुस्तक तयार करण्यात आले आहे. मात्र ही पुस्तके यंदा सर्वत्र पोहोचणार नसून प्रायोगिक तत्वावर काही तालुक्यात दिली जाणार आहे. त्यात यंदा दारव्हा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. दारव्हातील उपयागीता लक्षात घेऊन पुढील सत्रात एकात्मिक पाठ्यपुस्तके सर्वांना मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Schoolशाळा