शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

दुबईतून आलेले दाम्पत्य वैद्यकीय निरीक्षणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

दर्यापूर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असले तरी कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ तपासणीची कुठलीही व्यवस्था अद्याप उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे रुग्णालय असून, या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने आजारी रुग्ण येत असतात.

ठळक मुद्देदर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक समारंभ व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान दुबई येथून परतलेले एक दाम्पत्य वैद्यकीय निरीक्षणात आहेत. महसूल प्रशासनाच्या भेटीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दाम्पत्याची तपासणी केली.दर्यापूर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असले तरी कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ तपासणीची कुठलीही व्यवस्था अद्याप उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे रुग्णालय असून, या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने आजारी रुग्ण येत असतात. यासंदर्भात कुठलीही उपायोजना नसेल, तर आपत्कालीन घटनेसाठी जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.विषाणू संसर्गासंदर्भात तात्काळ उपाययोजना कराव्या, अशी मागणी दर्यापूरवासीयांनी केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात सर्दीच्या रुग्णांची भरमार आहे.दर्यापूर शहरात दोन दिवसांपूर्वी परदेशातून दोन नागरिक दाखल झाले. त्यांची मुंबई येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. दर्यापूर येथे दाखल झाल्यानंतर तहसीलदार, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासनाने संबंधितांच्या घरी जाऊन सर्व तपासणी करून घेतली. त्यांना १५ दिवस बाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.उपजिल्हा रुग्णालयात अद्यापही कुठलीही तपासणी यंत्रणा उपलब्ध नाही. अप्रिय प्रसंगी रुग्णाला अमरावती येथे हलविले जाणार आहे.- डॉ. दिलीप पगारेवैद्यकीय अधीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस