शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

नगरपंचायतच्या विरोधात नगरसेवकांचे उपोषण

By admin | Published: December 25, 2016 2:41 AM

शहरातील समस्यांचे अनेकदा निवेदन देऊन सभागृहात प्रश्न मांडून आणि शहरातील जनतेसोबत

प्रशासन हादरले : घाई गडबडीत कामे करणे सुरू, विकास कामात मोठा घोळ असल्याचा आरोप मारेगाव : शहरातील समस्यांचे अनेकदा निवेदन देऊन सभागृहात प्रश्न मांडून आणि शहरातील जनतेसोबत नगरपंचायतीवर मोर्चा काढूनही नगरपंचायतीचे प्रशासन कामात सुधारणा करीत नसल्याने शेवटी हतबल झालेल्या विरोधी नगरसेवकांनी शहरातील वृद्ध महिला तरूणासह नगरपंचायत कार्यालयासमोर २४ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले. शहरातील अनेक वॉर्डातील पथदिवे बंद, पाण्याची समस्या, रस्ते, नालीसफाई, स्वच्छता, घरबंधकाम परवानगी वीज जोडणीचे ना हरकत प्रमाणपत्र, स्थावर संपत्तीची नोंदणी जन्म-मृत्यु नोंद व दाखला आदी गोष्टी गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित असल्याने शहरातील जनता त्रस्त झाली आहे. यातच नगरपंचायत घोटाळ्याचे एक-एक किस्से बाहेर येत असल्याने आणि सी.ओ. व कार्यालयातील कर्मचारी यांच्यात तु-तु मै-मै सुरू असल्याने विकास कामांना खीळ बसली आहे. यामुळे त्रस्त असलेल्या शहरातील जनतेने आपल्या समस्या वॉर्डातील नगरसेवकांसमोर ठेवल्या. नगरसेवकांनी या समस्या नगरपंचायत प्रशासनासमोर ठेवल्या. परंतु नगरपंचायत प्रशासन विरोधी नगरसेवकांच्या मागण्या ऐकुण घ्यायलाच तयार नसल्याने आणि प्रशासनाकडून नगरसेवकांनाच अपमानजनक वागणुक मिळत असल्याने शेवटी विरोधी नगरसेवकांनी शहरातील नागरिकांसह २३ डिसेंबर रोजी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारून चर्चा करताना नगरपंचायत प्रशासन मोर्चेकऱ्यांच्या मागण्या ऐकुण न घेता आपलेच म्हणने पुढे रेटत असल्याने हतबल झालेल्या विरोधी नगरसेवकांनी आणि नागरिकांनी आज २४ डिसेंबरपासून नगरपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरवात केली. उपोषणाला बसलेल्या नगरसेवकांमध्ये खालीद पटेल, भारत मत्ते, नंदेश्वर आसुटकर, जिजाताई वरारकर, अरूणा मोरे, सुरेखा भादीकर, नलिनी ताकसांडे, या नगरसेवकांचा समावेश आहे. तर नागरिकांकडून विप्लव ताकसांडे, प्रकाश वरारकर, मेहमूद खान, अजय लेडांगे, विठाबाई पवार, आकाश भेले, अशोक मांदाडे, राजू पाटील, योगेश वेले, आशिष मेश्राम उपाषणाला बसले आहे. आज उपोषणकर्त्याच्या मंडपाला जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, पंचायत समितीचे उपसभापती गजानन खापने, बाजार समितीचे संचालक रवींद्र धानोरकर यांचेसह तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मोर्चेकऱ्यांच्या मागण्या जाणून घेत उपविभागीय अधिकारी वणी यांचेशी भ्रम्हणध्वणीवरून बोलून उपाषणकर्त्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावा, अन्यथा आंदोलन पुन्हा तीव्र करू असा इशारा दिला. (शहर प्रतिनिधी)