शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus यवतमाळच्या विलगीकरण कक्षात एकूण 36 जण दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 17:59 IST

निझामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या 34 लोकांची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली.

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण 36 जणांना दाखल करण्यात आले आहे. यापैकी 28 जण दिल्ली (निजामुद्दीन) येथील संमेलनाशी निगडीत आहेत. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 31 होती. यापूर्वीचे पाच असे एकूण 36 जण सद्यस्थितीत भरती आहेत. पाच जणांचे नमुने यापूर्वीच तपासणीकरीता नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले असून बुधवारी भरती झालेल्या 31 जणांचे नमुने 2 एप्रिल ला तपासणीकरीता पाठविण्यात आले आहे. सर्वांचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहेत.

निझामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या 34 लोकांची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. यातील 28 लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.  तर उर्वरीत सहा नागरिक अद्यापही जिल्ह्यात परत आले नाही. हे सहा जण ज्या जिल्ह्यात गेले आहेत, तेथील प्रशासनासोबत यवतमाळ जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला असून त्यांची माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 96 आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात 230 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे स्वत:च्या आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विदेशातून आलेले, निजामुद्दीन (दिल्ली) वरून आलेले किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून समोर येऊन प्रशासनाला याबाबत माहिती द्यावी. बाहेरून आलेल्या ज्या नागरिकांनी अद्यापही प्रशासनाशी संपर्क साधला नाही, त्यांनी  त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस