शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा पॉझिटिव्ह दर साडेसहा टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST

इतर आजार आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या लोकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास कोरोनावर सहज मात करता येते. संसर्गाचा धोक वाढू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना तपासणी दोन पध्दतीने केली जात आहे. रॅपीड अ‍ॅन्टिजन टेस्ट किटचा वापर कोविड सेंटरवर केला जात आहे.

ठळक मुद्देसंसर्गाची दुसरी बाजू : जिल्ह्यातील बाधितांचा मृत्यू दर अडीच टक्के

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. प्रत्यक्षात कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुक्त होणारे रुग्ण यांच्या दरात मोठी तफावत आहे. त्यामुळे शंका वाटल्यास निर्धास्तपणे कोरोना चाचणी करून योग्य उपचार घेतल्यास सहज मात करता येते.जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या तपासणीपैकी केवळ ६.४० टक्केच व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या ९३.५९ टक्के आहे. बाधितांपैकी २.५५ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत ४० हजार ८७५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ३८ हजार २५५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. केवळ दोन हजार ६२० जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील बहुतांश जणांमध्ये कोणतीही लक्षणे नाही.इतर आजार आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या लोकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास कोरोनावर सहज मात करता येते. संसर्गाचा धोक वाढू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात कोरोना तपासणी दोन पध्दतीने केली जात आहे. रॅपीड अ‍ॅन्टिजन टेस्ट किटचा वापर कोविड सेंटरवर केला जात आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेत आरटीपीसीआर मशिनवर केली जाते. जिल्हा प्रशासनाने माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रविवारी पुरविलेल्या माहितीच्या आधारेच हा आराखडा तयार केला आहे. सध्या कोविड केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड आणि गृह विलगीकरणात उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५४६ इतकी आहे. संसर्ग सर्वत्र दिसत असला तरी घाबरण्याचे कारण नाही, केवळ दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे.आरटीपीसीआरवर ८.७५ व रॅपीड टेस्टमध्ये ३.३६ टक्केआरटीपीसीआर मशीनवर आतापर्यंत २० हजार २२१ नमुने तपासण्यात आले. यामध्ये एक हजार ८१८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. याची टक्केवारी ८.७५ इतकी आहे. १८ हजार ९५३ नमुने निगेटिव्ह असून, याची टक्केवारी ९१.२४ इतकी आहे. तालुका स्थळावरील कोविड सेंटरवर करण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट किटमध्ये पॉझिटिव्हची संख्या ३.३६ टक्के आहे. निगेटिव्ह येणाऱ्याचे प्रमाण ९६.६३ टक्के आहे. आतापर्यंत रॅपीड टेस्ट किटद्वारे १७ हजार ५७२ नमुने तपासण्यात आले. यामध्ये केवळ ५९२ नमुने पॉझिटिव्ह निघाले. १६ हजार ९८० नमुने निगेटिव्ह आले आहेत.कोरोनामुक्तीचे प्रमाण ६९ टक्केकोरोना संसर्गाचे रुग्ण ज्या प्रमाणात सापडत आहे, त्यापेक्षा कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. साडेसहा टक्के नमुने पॉझिटिव्ह येत आहेत. तर या आजारातून बरे होणाºयाचे प्रमाण ६८.८१ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजार ६२० रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यापैकी एक हजार ८०३ जण कोरोनातून पूर्ण पणे बरे झाले आहे. एकवेळा कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची बाधा झालेला एकही रुग्ण आढळला नाही, हे विशेष.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या