शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

महागाव तालुक्यात कोरोना शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

साधूनगर येथील त्या पॉझिटिव्ह इसमाचे महागाव येथे सोनाराचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी तो नांदेड व नंतर जळगावला सोने खरेदीसाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. चार दिवसांपूर्वी त्यांना सर्दी, खोकला व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. गावात एका डॉक्टरकडे त्यांनी उपचार घेतला. नंतर पुसदच्या खासगी दवाखान्यात दाखल होण्याचे प्रयत्न केले.

ठळक मुद्देसाधूनगरला पहिला पॉझिटिव्ह : प्रशासनाची गावात धडक

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/मुडाणा : मुडाणा लगतच्या साधूनगर (तांडा) येथील एका ४२ वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले. माहिती मिळताच एसडीओंसह संपूर्ण प्रशासन तेथे दाखल झाले.साधूनगर येथील त्या पॉझिटिव्ह इसमाचे महागाव येथे सोनाराचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी तो नांदेड व नंतर जळगावला सोने खरेदीसाठी गेला होता. तेथून परतल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. चार दिवसांपूर्वी त्यांना सर्दी, खोकला व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. गावात एका डॉक्टरकडे त्यांनी उपचार घेतला. नंतर पुसदच्या खासगी दवाखान्यात दाखल होण्याचे प्रयत्न केले. मात्र त्या डॉक्टरांनी तत्काळ तेथील कोविड सेंटरला माहिती दिली. त्यामुळे त्याला प्रथम पुसद व नंतर यवतमाळच्या आयसोलेशन वॉर्डात पाठविण्यात आले. दरम्यान, रविवारी मध्यरात्री त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येताच तालुका प्रशासनात खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार नीलेश मडके, नायब तहसीलदार डॉ.संतोष आदमुलवाड, उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण, ठाणेदार डी.के. राठोड आदींनी रविावरी व सोमवारी तातडीने साधूनगरला भेट दिली. तेथून रुग्णाच्या संपर्कातील १२ हायरिक्स नागरिकांना लगेच महागावच्या विलगीकरण कक्षात क्वारंटाईन केले.याशिवाय त्या रुग्णाच्या संपर्कातील इतर १९ जणांना गावात घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. साधूनगर गाव सील करण्यात आले. महागावातील साराफा लाईनही सील करण्यात आली आहे.एसडीओंच्या उपस्थितीत सराफी दुकान उघडलेसदर बाधित रुग्ण यवतमाळला असल्यामुळे त्यांचे महागाव येथील सोनार दुकानाचे कुलूप सोमवारी एसडीओंच्या उपस्थितीत तोडण्यात आले. दुकानातील रजिस्टरची पाहणी करून सदर रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. अद्यापही प्रशासन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. साधूनगर येथे आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या