जिल्ह्यात कोरोनाचे १६७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 05:00 IST2022-02-03T05:00:00+5:302022-02-03T05:00:22+5:30

बुधवारी १ हजार १५६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ९८९ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या १६७ जणांमध्ये ७२ महिला व ९५ पुरुष आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ८८० इतकी झाली आहे, तर कोरेानामुक्त झालेल्यांची संख्या ७४ हजार ३८५ इतकी आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात एक हजार ७९३ जणांचा मृत्यू झाला आहे.  आरोग्य विभागाने आठ लाख २० हजार ६७० नमुन्यांची तपासणी केली आहे.

Corona has 167 new positive patients in the district | जिल्ह्यात कोरोनाचे १६७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे १६७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप काही केल्या थांबायला तयार नाही. सातत्याने कोरोना रुग्णांची भर पडत आहे. बुधवारी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार १६७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. सध्या ४१ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल आहेत, तर १ हजार ६६१ रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहे. 
बुधवारी १ हजार १५६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ९८९ जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या १६७ जणांमध्ये ७२ महिला व ९५ पुरुष आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ८८० इतकी झाली आहे, तर कोरेानामुक्त झालेल्यांची संख्या ७४ हजार ३८५ इतकी आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात एक हजार ७९३ जणांचा मृत्यू झाला आहे.  आरोग्य विभागाने आठ लाख २० हजार ६७० नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यामध्ये सात लाख ४२ हजार ४८० नमुने निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा ९.४९ इतका असून, दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर १४.४५ आहे.
 कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे, कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, कोरोनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

यवतमाळात ५५ नवे रुग्ण
- आर्णी तालुक्यातील ३०, बाभूळगाव सहा, दारव्हा सहा, दिग्रस १९, घाटंजी ११, महागाव एक, नेर एक, पांढरकवडा ११, पुसद ९, राळेगाव एक, वणी सहा, यवतमाळ ५५, झरी जामणी एक व जिल्ह्याबाहेरील १० रुग्णांचा समावेश आहे.

 

Web Title: Corona has 167 new positive patients in the district