शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा विळखा होतोय घट्ट; १५ दिवसांत जिल्ह्यात नवे ७१७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

शनिवारी कोरोना तपासणीचे १५८३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२१ पॉझिटिव्ह, तर १४६२ अहवाल निगेटिव्ह आले. या नव्या रुग्णामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५६३ झाली आहे. यातील ५३३ जण जिल्ह्यातील, तर ३० जण जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी ५०४ जण गृहविलगीकरणात असून, ५९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत ७३ हजार ६९८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७१ हजार ३४७ जणांनी कोरोनावर मात केली असून, १७८८ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. शनिवारी आणखी १२१ बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६३ झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांत जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ७१७ ची भर पडल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. सध्या ॲक्टिव्ह असलेल्यांपैकी ५९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा कोरेानामुक्तीच्या वाटेवर असतानाच रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. १ ते १५ जानेवारी या कालावधीत ७१७ बाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या या लाटेत रुग्णाला गंभीर स्वरूपाचा आजार होत नसल्याचे सांगितले जात असले तरी रुग्णांची संख्या अशीच वाढत गेल्यास त्या प्रमाणात गंभीर रुग्णांची संख्याही वाढणार असल्याने येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणेवर पुन्हा ताण येण्याची भीती वर्तविली जात आहे. शनिवारी कोरोना तपासणीचे १५८३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२१ पॉझिटिव्ह, तर १४६२ अहवाल निगेटिव्ह आले. या नव्या रुग्णामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५६३ झाली आहे. यातील ५३३ जण जिल्ह्यातील, तर ३० जण जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी ५०४ जण गृहविलगीकरणात असून, ५९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  जिल्ह्यात आजपर्यंत ७३ हजार ६९८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७१ हजार ३४७ जणांनी कोरोनावर मात केली असून, १७८८ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.  केवळ १५ दिवसात कोरोनाचे सक्रिय रुग्ण पाचशेच्या पलीकडे पोहोचल्याने तिसऱ्या लाटेचा धोका स्पष्ट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

  यवतमाळमध्ये निघाले सर्वाधिक ५२ रुग्ण - सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण यवतमाळ तालुक्यात आढळत आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या १२१ पैकी तब्बल ५२ रुग्ण हे यवतमाळ येथील आहेत. आर्णी तालुक्यातील आठ, दारव्हा पाच, दिग्रस चार, कळंब तीन, नेर १०, पुसद नऊ, राळेगाव १२, वणी सहा, झरी जामणी दोन, तर पांढरकवडा तालुक्यात एक बाधित रुग्ण आढळून आला असून, इतर नऊ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. बाधित आलेल्या १२१ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३८ महिला व ८३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. 

कोरोनाला हलक्यात घेऊ नका - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या जिल्हावासीयांची चिंता वाढविणारी आहे. अवघ्या १५ दिवसांत जिल्ह्यात ७१७ बाधित रुग्ण आढळले आहेत. १ जानेवारी रोजी जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ०.३५ होता. तो आता शनिवार १५ जानेवारी रोजी ७.६४ वर गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला हलक्यात न घेता सतर्कता बाळगायला हवी.  फिजिकल डिस्टन्सींग ठेवण्याबरोबरच घराबाहेर पडताना मास्क वापरायला हवा. दरम्यान जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांसाठी १७०६ बेडची उपलब्धता असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या