शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कार्यकारी अभियंत्याची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 22:09 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता अहीरराव यांची त्यांच्या अधिनस्त दारव्हा येथील शाखा अभियंत्याने चक्क दिशाभूल केल्याचा प्रकार पुढे आला आहे.

ठळक मुद्देप्रत्यक्ष स्थळ भेटीची प्रतीक्षा : खर्च मंजूर रस्त्यावरच दाखविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता अहीरराव यांची त्यांच्या अधिनस्त दारव्हा येथील शाखा अभियंत्याने चक्क दिशाभूल केल्याचा प्रकार पुढे आला आहे. शासनाचा आठ लाखांचा निधी जांभोरा-नांदगव्हाण या मंजूर मार्गावरच खर्च झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न शाखा अभियंत्याकडून केला जात आहे.दारव्हा तालुक्यातील जांभोरा ते नांदगव्हाण हा रस्ता विकास आराखड्यात मंजूर आहे. प्रत्यक्षात तेथे पांदण रस्ताही नाही. भविष्यात पैसा उपलब्ध झाल्यास या मंजूर रस्त्यावर बांधकाम करता येईल, अशी तरतूद करून ठेवण्यात आली आहे. परंतु या मंजूर रस्त्यावर आधी तीन लाख व नंतर पाच लाख असे आठ लाख रुपये मंजूर केले गेले. प्रत्यक्षात आठ लाखांचा हा निधी मंजूर रस्त्यापासून सुमारे तीन किलोमीटर दूर कामठवाडा-लिंगा मार्गावर जांभोºयाकडे जाणाºया पांदण रस्त्यावर खर्ची केला गेला. त्यातून मोठा पूल उभारला गेला. या मार्गावर यापूर्वीच डांबरीकरण काही अंतरापर्यंत केले गेले आहे. पांदण रस्त्यावर आठ लाखांचा पूल उभा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर दारव्ह्याच्या शाखा अभियंत्याला जिल्हा परिषदेत पाचारण करण्यात आले होते. मात्र तेथे या अभियंत्याने ‘लोकमत’चा गैरसमज झाला, आठ लाखांचा खर्च झालेला निधी हा जांभोरा-नांदगव्हाण रस्त्यावरच वापरला गेल्याचे खोटे पण ठासून सांगत कार्यकारी अभियंता अहीरराव यांना पटवून दिले. परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. कार्यकारी अभियंता अहीरराव यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केल्यास शाखा अभियंत्याचा खोटारडेपणा उघड होण्यास वेळ लागणार नाही. कार्यकारी अभियंत्यांनी सदर शाखा अभियंत्याची गेल्या काही वर्षात मंजूर केलेल्या कामांची कुंडली तपासल्यास असे अनेक गैरप्रकार उघडकीस होण्याची शक्यता जिल्हा परिषद बांधकाम विभागातूनच वर्तविली जात आहे.