शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी फिप्टी-फिप्टी

By admin | Updated: July 20, 2014 00:08 IST

जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या. तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला.

नगराध्यक्ष निवडणूक : चार महिलांना संधी, उपाध्यक्षपदांवर काँग्रेसचे वर्चस्वयवतमाळ : जिल्ह्यातील सात नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक पार पडली. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीला समान तीन जागा मिळाल्या. तर एका जागेवर परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला. उमरखेड, आर्णी व दारव्हा नगरपरिषदा काँग्रेसच्या तर यवतमाळ, पुसद व घाटंजी नगरपरिषदा राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या. दिग्रसमध्ये दोन्ही पदावर परिवर्तन विकास आघाडीने बाजी मारली. नगराध्यक्षाच्या सात पैकी चार जागांवर महिलांना संधी मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सातपैकी सर्वाधिक पाच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या. भाजपाला केवळ एक उपाध्यक्षपद मिळाले. यवतमाळच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष राय तर उपाध्यक्षपदी भाजपाचे मनीष दुबे बिनविरोध विजयी झाले. उपाध्यक्षपद भाजपाच्या मनीष दुबे यांना देण्यात आले. दारव्हा नगरपरिषदेत अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष अशोक चिरडे यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली. आर्णीमध्ये काँग्रेसचे नगर उपाध्यक्ष आरिज बेग यांना बढती देत नगराध्यक्ष बनविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने यवतमाळसह तीन नगरपरिषदांवर आपले वर्चस्व निर्माण केले. घाटंजीमध्ये राष्ट्रवादीच्या चंद्ररेखा रामटेके बिनविरोध निवडून आल्या. पुसदमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेसची युती झाली. तेथे राष्ट्रवादीच्या माधवी गुल्हाने निवडून आल्या. दिग्रसच्या नगराध्यक्षपदी परिवर्तन विकास आघाडीच्या सरिता धुर्वे विजयी झाल्या आहेत. नगर उपाध्यक्ष पदासाठी सात पैकी पाच जागेवर निवडणूक पार पडली. तर दोन जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. यवतमाळात भाजपाचे मनीष दुबे, दिग्रसमध्ये परिवर्तनचे डॉ. मुश्ताक प्यार मोहंमद बिनविरोध निवडले गेले. पुसदमध्ये काँग्रेसचे डॉ. मोहंमद नदीम, उमरखेडमध्ये काँग्रेसच्या नजमाबी दौलतखान, घाटंजीत काँग्रेसचे परेश कारिया, आर्णीमध्ये काँग्रेसच्या नीता ठाकरे तर दारव्ह्यामध्ये काँग्रेसच्या माधुरी गडपायले उपाध्यक्ष पदी विजयी झाल्या. यवतमाळ नगरपरिषदेत अध्यक्षपद हातून गेल्यानंतर किमान उपाध्यक्षपद तरी पदरी पडावे म्हणून काँग्रेसने अखेरची धडपड चालविली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. गटनेते पदावरूनच काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये दोन गट पडले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी अवघ्या तासाभरात दोन गट नेते बदलविल्याने जिल्हा प्रशासनही संभ्रमात पडले होते. नगराध्यक्ष सुभाष राय यांच्या निवडीनंतर यवतमाळ शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. त्यांचे चौकाचौकात स्वागत आणि पेढेतुला करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)