शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सातही मतदार संघात काँग्रेसला नाकारले

By admin | Updated: October 19, 2014 23:18 IST

पाच वर्षांपूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना नाकारले.

यवतमाळ : पाच वर्षांपूर्वी सात पैकी तब्बल पाच आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणुकीत सातही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांना नाकारले. राळेगाव, उमरखेड, आर्णी या मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिली. तर वणी, दिग्रसमध्ये तिसऱ्या, यवतमाळ व पुसदमध्ये चौथ्या स्थानावर काँग्रेस उमेदवार फेकले गेले. सातपैकी तीन उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचविता आले नाही. त्यामध्ये खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या मुलाचाही समावेश आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पाचही जागा यावेळी मतदारांनी त्यांच्याकडून काढून घेऊन भाजपाच्या हाती दिल्या आहेत. यावरून काँग्रेस प्रती मतदारांमध्ये असलेली चिड स्पष्ट होते. अशीच अवस्था जिल्ह्यात पक्ष संघटनेची झालेली आहे. प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा असूनही येथे पक्षाची जिल्हा कार्यकारिणी नाही. या कार्यकारिणीशिवाय पक्ष निवडणुकीला सामोरे गेला. जिल्हा काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी आहे. प्रदेशाध्यक्ष विरुद्ध इतर असे चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले. जिल्ह्यातील काँग्रेसच्या मंत्री-आमदारांना शह देण्यासाठी त्यांच्या बंडखोरांना आश्रय देणे प्रदेशाध्यक्षांना चांगलेच भोवले. पक्ष संघटन खिळखिळे झाले आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. जिल्ह्यात पाच वर्षे पाच आमदार आणि प्रदेशाध्यक्षपद असूनही जिल्ह्याच्या पदरी काहीच पडले नाही. साडेपाच वर्ष टाईमपास केल्यानंतर अखेरच्या सहा महिन्यात काँग्रेसच्या आमदारांनी भूमिपूजनाचा सपाटा लावून केवळ विकास कामांचा देखावा निर्माण केला. त्यामुळेच मतदारांनी काँग्रेसला जिल्ह्यात सपशेल नाकारले. पाचवरून शून्यावरसन २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने जिल्ह्यातील वणी, राळेगाव, आर्णी, यवतमाळ, उमरखेड या सात पैकी पाच जागा आपल्याकडे खेचून आणल्या होत्या. त्यावेळी या सर्व जागांचे श्रेय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्वत:कडे घेतले होते. मात्र आता त्यांच्याच कार्यकाळात काँग्रेस या पाच जागांवरून शुन्यावर आली आहे.