शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कंपन्यांच्या प्रचार युद्धामुळे संभ्रम

By admin | Updated: May 24, 2014 00:13 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बियाणे कंपन्यांनी शेतकर्‍यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रचाराचा फंडा वापरणे सुरू केले आहे. एकमेकांशी स्पर्धा करीत आपलेच वाण कसे श्रेष्ठ आहे,

यवतमाळ : खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बियाणे कंपन्यांनी शेतकर्‍यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रचाराचा फंडा वापरणे सुरू केले आहे. एकमेकांशी स्पर्धा करीत आपलेच वाण कसे श्रेष्ठ आहे, हे दाखविण्याचा प्रकार जाहिरातीच्या माध्यमातून होत आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप आणि रबी या दोनही हंगामात जबरदस्त नैसर्गिक तडाखा बसला आहे. पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकर्‍यांना मिळालेली नाही. पिक विम्यादाखल लाखो रुपये शेतकर्‍यांनी बँकांमध्ये जमा केले. जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना व खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही ही रक्कम मात्र शेतकर्‍यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. अशातच शेतकर्‍यांना भुलविण्यासाठी विविध कंपन्यांनी आपले बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारण्यासाठी प्रचार तंत्राचा वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा प्रचंड तुटवडा पडल्यामुळे बियाण्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस सतत सुरू होता. यामुळे सोयाबीनचे बियाणे पूर्णत: खराब झाले. आता सोयाबीन तुटवड्याच्या नावाखाली बियाण्याच्या किमती वाढविण्यात आल्या आहे. या बियाण्यांच्या उगवण शक्तीवर प्रश्नचिन्ह लागले असताना बियाणे कंपन्या मात्र आपले बियाणे कसे श्रेष्ठ आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक स्थळावर भरघोस उत्पादनाचे दावे करणारे पत्रक चिकटविण्यात आले आहे. काही कंपन्यांनी गावोगाव जाऊन पथनाट्य सादर करण्याचा फंडा वापरला आहे. काही बियाणे कंपन्यांनी कृषी केंद्र संचालकांना हाताशी धरून शेतकर्‍यांना आकृष्ट करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्त्याच्या कडेवर असलेल्या झाडांवरही विविध फलके लावण्यात आली आहे. यातून शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. कृषी विभागाने या संदर्भात भरारी पथकांची निर्मिती केली असली तरी एकदा शेतात पेरलेले बियाणे उगवण शक्तीत कमी पडले तर शेतकर्‍याचे समोरचे नियोजन पूर्णत: कोलमडून जाते. बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेता शेतकर्‍यांनी घरचे बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. मात्र यंंदा सोयाबीन पिकाची झालेली दुर्दशा लक्षात घेता कुठल्याच शेतकर्‍याकडे सोयाबीन शिल्लक असण्याची शक्यता नाही. त्यामुळे कृषी विभागाने दिलेले सल्ले किती निराधार आहे, हे सिद्ध होते. बियाणे कंपन्यांच्या प्रचार युद्धात शेतकर्‍यांच्या होणार्‍या संंभाव्य फसवणुकीबाबत शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधी दक्ष असल्याचे दिसून येत नाही. विदर्भात येणारे सोयाबीनचे बियाणे बुलढाणा जिल्ह््यात सील करण्यात आले होते. (शहर प्रतिनिधी)