शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू आजार रोखण्यासाठी घरोघरी स्वच्छता मोहीम राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पूर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ  :  जिल्ह्यात डेंग्यूचा आजार वाढू नये यासाठी जिल्हा परिषद व नगर परिषद यांनी सर्व नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, नागरिकांनी कोरडा दिवस पाळून घराच्या परिसरातील भंगार साहित्याची विल्हेवाट लावून पाणी साचणार नाही यासाठी उपायोजना करून डेंग्यू व मलेरियाच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी आमोल येडगे यांनी केले.शुक्रवारी विशेष स्वच्छता अभियानाची सुरूवात यवतमाळ शहरातील जय-विजय चौक व संभाजीनगर परिसरातून करण्यात आली. याठिकाणी साफसफाई मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेवून जिल्हाधिकारी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नगराध्यक्ष कांचन चौधरी, मुख्याधिकारी माधुरी मडावी तसेच आरोग्य सभापती साधना काळे, नगरसेवक सुजित राय, संगीता राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय आकोलकर आदी सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे, शौचालयाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जुने टायर, प्लॅस्टिक इ. मध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस घरातील सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पूर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना करण्यास सांगितले. ही साफसफाई केवळ एक दिवसासाठी न करता किमान सात दिवस  करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियमितपणे स्वच्छता मोहिमेला भेटी देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.  नगर परिषदेतील डॉ. विजय अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी क्रांतीकुमार मावडीकर, डॉ. तनवीर शेख, प्रशांत पाटील, टी. व्ही. कुळकर्णी, धीरज पिसे, रवी रामेकर, सुनील वंजारी, मुन्ना शुक्ला, मोहन दहेकर, संतोष गजभिये आदी यावेळी मोहिमेदरम्यान उपस्थित होते. 

मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे आवाहन - यवतमाळ शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी प्रत्येक दुकानदार, तेथे काम करणारे कर्मचारी व अन्य प्रत्येक नागरिकाला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच डेंग्यू आजाराचा फैलाव रोखण्यासाठी त्यांनी उपाययोजना सूचविल्या आहे. डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यातून होते. त्यामुळे घरातील अडगळीत ठेवलेले सामान, फ्रीजचा टफ, परिसरातील नाल्या स्वच्छ ठेवण्याची सूचना मडावी यांनी केली आहे. घरातील खिडक्यांना, फीश टॅंकला जाळ्या बसवाव्या, घराचा परिसर श्रमदानातून स्वच्छ ठेवावा, असे आवाहन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी केले.  

 

टॅग्स :dengueडेंग्यूcollectorजिल्हाधिकारी