शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनो सावधान.. बंद घरावर चोरट्यांचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बालाजी पार्क येथील  अरविंद लक्ष्मण राठोड   हे घरगुती कामानिमित्त  बाहेरगावी गेले होते. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी  दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील एका रूममधील पेटीत ठेवलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, दोन तांबडे गुंड, गंगाळ, पितळेचे कोपर, एम. आय. कंपनीचा जुना वापरता टीव्ही तसेच डिश बॉक्स असा  ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सण-उत्सवाच्या काळात नागरिकांची बाहेरगावी जा-ये सुरू असते. नेमक्या या संधीचा फायदा चोरट्यांकडून उठविला जात आहे. नेर येथील लक्ष्मीनगरमधून चोरट्यांनी ८५ हजारांचा ऐवज लंपास केला. तर पुसदनजीकच्या कवडीपूर ग्रामपंचायत हद्दीतून घर फोडून ६७ हजारांचा ऐवज पळविण्यात आला. विशेष म्हणजे या दोनही घटना घरमालक बाहेरगावी गेल्यानंतर संधी साधून केल्या गेल्या आहेत. नेर शहरातील महालक्ष्मीनगर येथील एका प्राध्यापकाचे घर फोडून ८५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.महालक्ष्मीनगर येथील प्रा. निलेश रामदास मोकाळे हे वर्धा येथे एका लग्न सोहळ्यासाठी परिवारासह गेले होते. ही संधी साधत मंगळवारी रात्री चोरट्यांनी घरातील कुलूप कोंड्यासह बाहेर काढून आतमध्ये प्रवेश केला व १२ ग्रॅम सोन्याची चेन, तीन ग्रॅमचे कानातील दागिने आणि रोख १८ हजार रुपये असा एकूण ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला. जुन्या दराप्रमाणे हा ऐवज ४७ हजार रुपये किमतीचा आहे. प्रा. मोकाळे हे बुधवारी सकाळी परतले असता, घरातील स्थिती पाहून चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. श्वान पथकासह पोलीस पथक घटनास्थळी आले. मात्र, अद्याप चोरांचा सुगावा लागलेला नाही. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवडीपूर ग्रामपंचायतीमधील बालाजी पार्क येथून ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला. ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बालाजी पार्क येथील  अरविंद लक्ष्मण राठोड   हे घरगुती कामानिमित्त  बाहेरगावी गेले होते. घर मालक बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी  दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील एका रूममधील पेटीत ठेवलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, दोन तांबडे गुंड, गंगाळ, पितळेचे कोपर, एम. आय. कंपनीचा जुना वापरता टीव्ही तसेच डिश बॉक्स असा  ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. 

 लोहारा येथे भरदुपारी घर फोडून चार लाख पळविले- वाघापूर बायपासवर शुभम काॅलनी येथील बंद घर भरदुपारी फोडून चोरट्यांनी रोख एक लाख १० हजार आणि दोन लाख ६१ हजारांचे सोने असा तीन लाख ८३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. शासकीय रुग्णालयातील एक्स-रे तज्ज्ञ विलास धोंडबाजी वासनिक हे कर्तव्यावर गेले होते. घरी त्यांची मुलगी व लहान मुलगा होता. ते दोघेही आरटीओ कार्यालयात लायन्सनसाठी गेले. ही संधी पाहूनच चोरट्यांनी बुधवारी दुपारी घरात प्रवेश केला. स्वयंपाकघरातील मागील दाराचा कोंडा तोडून दागिने व रोख रक्कम पळविली. या घटनेचा तपास लोहारा ठाणेदार अनिल घुघल हे करीत आहेत.

 

टॅग्स :Thiefचोर