शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीच्या हत्याप्रकरणावर होता मुख्यमंत्र्यांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

 मुकुटबन परिक्षेत्रात २५ एप्रिल रोजी दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या ‌वाघिणीला गुहेत डांबून तिची अतिशय निर्दयीपणे शिकारीच्या हेतून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने मुख्यमंत्री व्यथित झाले. घटनेची माहिती मिळताच, त्यांनी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना या प्रकरणात लक्ष घालून तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या, अशी माहितीही भुमरे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पोलिसांनी रात्रंदिवस परिश्रम करून गर्भवती वाघिणीच्या मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वॉच होता, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मुकुटबन परिक्षेत्रात २५ एप्रिल रोजी दोन महिन्यांची गर्भवती असलेल्या ‌वाघिणीला गुहेत डांबून तिची अतिशय निर्दयीपणे शिकारीच्या हेतून हत्या करण्यात आली. या प्रकरणाने मुख्यमंत्री व्यथित झाले. घटनेची माहिती मिळताच, त्यांनी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना या प्रकरणात लक्ष घालून तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या, अशी माहितीही भुमरे यांनी दिली. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी यांनी यावेळी व्यक्त केला. गर्भवती वाघिणीच्या मारेकऱ्यांना जेरबंद करण्यात वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने व त्यांच्या पथकाची कामगिरी मोलाची ठरली. पोलिसांनी पाटण परिसरात खबरे पेरून ठेवले होते. आरोपी अशोक लेतू आत्राम व लेतू रामा आत्राम यांनी वाघिणीचे नख विकण्याचा प्रयत्न चालविला असल्याची माहिती मिळताच सापळा रचून शुक्रवारी दुपारी आरोपींना अटक करण्यात आली.

५० हजारांचे बक्षीस  या प्रकरणाच्या तपासासाठी वनविभाग व पोलिसांच्या वेगवेगळ्या चमू तयार करण्यात आल्या होत्या. ज्या चमूने तपासात बाजी मारली, त्यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत  सांगितले.

 

टॅग्स :TigerवाघPoliceपोलिस