शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री कळंबमध्ये

By admin | Updated: December 28, 2016 00:23 IST

राळेगाव विधानसभा मतदार संघात गेले दोन महिने मुख्यमंत्री समाधान शिबिर राबविण्यात आले.

उद्या समाधान शिबिर : राळेगाव विधानसभा मतदार संघातील समस्या
यवतमाळ : राळेगाव विधानसभा मतदार संघात गेले दोन महिने मुख्यमंत्री समाधान शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचा समारोप गुरूवार, २९ डिसेंबर रोजी कळंब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहणार असल्याची माहिती राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.
आमदार डॉ. उईके यांनी सांगितले की, राळेगाव, कळंब व बाभूळगाव या तीन तालुक्यांत मुख्यमंत्री शिबिराच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. सर्वसामान्यांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. यातून सामान्य जनतेच्या विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाचा निपटारा करण्यात आला. यात प्रामुख्याने कोलाम आणि पारधी बांधवाना घरोघरी जाऊन जात प्रमाणपत्र देण्यात आले. ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमातून अनेक गावांतील समस्या त्याच ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित निकाली काढण्यात आल्या.
कळंबची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान राबवून चक्रावती नदीचे पुनरूज्जीवन करण्यात आले. या नदीवर बंधारे टाकण्यासाठी १३ कोटींचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यातील दीड कोटी रूपये प्राप्त झाले. सावरखेडा येथे महाआरोग्य शिबिर घेऊन पाच हजार रूग्णांची तपासणी करण्यात आली. राळेगावला सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वीज उपकेंद्र मंजूर केले. बाभूळगाव येथे रोजगार मेळावा घेऊन सुशिक्षित बेरोजगार आयटीयाधारकांना विविध कंपन्यात रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे ४०० युवकांना रोजगार मिळाला. आता गुरूवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. उईके यांनी सांगितले. बेंबळा प्रकल्पासाठी केंद्राकडे निधीची मागणी केली होती. ती मान्य झाली असून रखडलेली कामे लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरच होईल, असेही ना. येरावर यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी जिल्हाध्यक्ष उद्धवराव येरमे, जिल्हा परिषद सदस्य अमन गावंडे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)