शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला हवा मर्जीतील सीईओ

By admin | Updated: July 19, 2014 01:49 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या मर्जीतील

मुलाखती : सोईनुसार ‘वाकणाऱ्या’ उमेदवाराचा शोधयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या मर्जीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या शोधात आहेत. बँकेचे विद्यमान सीईओ अ‍ॅड. पुरुषोत्तम काकडे यांना तीन महिने मुदतवाढ दिली गेली होती. ही मुदत जुलै अखेर संपणार आहे. त्यामुळे बँकेने नव्या सीईओसाठी अर्ज मागितले आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी मुलाखतीही झाल्या. मात्र नागरी बँकांचा अनुभव असलेलेच उमेदवार आले. त्यातून बँकेला हवे तसे सक्षम उमेदवार मिळाले नसल्याचे सांगितले जाते. सीईओ पदाच्या पात्रतेसोबतच त्याची ‘फ्लेक्सीबिलीटी’ तपासली जात आहे. सीईओ पदाचा उमेदवार संचालकांच्या आदेशावर किती ‘वाकणारा’ आहे, हे महत्वाचे ठरते. कदाचित हीच खरी पात्रताही बँकेत पाहिली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा बॅकेच्या सरव्यवस्थापकांचे नावसुद्धा सीईओ पदाच्या शर्यतीत आहे. बँकेचा आर्थिक कारभार सुधारण्यासाठी व नियमानुसार बँक चालविण्यासाठी अनेक संचालक त्यांच्या बाजूने आहेत. मात्र काही ज्येष्ठ संचालकांचा त्यांना विरोध आहे. कारण ताठर भूमिकेचे सरव्यवस्थापक सीईओ झाल्यास आपल्या कारभाराचे काय याची चिंता या काही संचालकांना भेडसावत असल्याची चर्चा बँकेच्या वर्तुळातून ऐकायला मिळते. वैयक्तिकरीत्या दोन डझनावर संचालक सरव्यवस्थापकांसाठी पॉझिटीव्ह असले तरी एकत्र बैठकीत मात्र ज्येष्ठांकडून मतपरिवर्तन करून त्यांना ‘निगेटिव्ह’ बनविले जात असल्याचे बँकेचे हित जोपासणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. लाखो शेतकऱ्यांचा आर्थिक आधार आणि हजारांवर कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचे साधन असलेली ही बँक बंद पडू नये, त्यासाठी कठोर निर्णय घेणारे प्रशासन, व्यवस्थापन आणि संचालकसुद्धा यावे, अशी या सामान्य कर्मचाऱ्यांची रास्त भावना आहे. (जिल्हा प्रतिनिधी)