शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गतवर्षी जळत होत्या चिता, यंदा भडकतोय द्वेषाचा उन्माद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षी हाहाकार माजविला. अत्यावश्यक सेवा वगळता अवघे यवतमाळ ठप्प झाले होते. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असल्याने शासकीय यंत्रणाही धास्तावलेली होती. बेड मिळाला तर ऑक्सीजन नसायचा आणि ऑक्सीजन मिळाला तर रेमडेसीव्हीरसाठी धावाधाव करावी लागायची. कोरोनाने अनेक जीव घेणे प्रश्न सर्वांसमोर उभे केले होते. एकीकडे औषधांचा तुटवडा होता, तर दुसरीकडे लस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोना नसलेल्या रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे ?

विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप मागील वर्षी याच एप्रिल महिन्यात शिगेला होता. २० ते ३० एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल ३५१ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा कोरोनाची लाट ओसरली असली तरी राजकीय विद्वेषाचा वणवा मात्र भडकलेला आहे. त्यामुळेच कोरोना संकटातून आम्ही नक्की काय शिकलो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील वर्षी हाहाकार माजविला. अत्यावश्यक सेवा वगळता अवघे यवतमाळ ठप्प झाले होते. रुग्णांची संख्या भरमसाठ वाढत असल्याने शासकीय यंत्रणाही धास्तावलेली होती. बेड मिळाला तर ऑक्सीजन नसायचा आणि ऑक्सीजन मिळाला तर रेमडेसीव्हीरसाठी धावाधाव करावी लागायची. कोरोनाने अनेक जीव घेणे प्रश्न सर्वांसमोर उभे केले होते. एकीकडे औषधांचा तुटवडा होता, तर दुसरीकडे लस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोना नसलेल्या रुग्णांनी उपचारासाठी जायचे कुठे ? असाही प्रश्न निर्माण झाला होता. वाढत्या कोरोनामुळे अत्यावश्यक सेवाही सकाळी ११ पर्यंतच ठेवण्यात आली. दुसरीकडे मेडिकलमधील खाटाही फुल्ल झाल्याने अतिरिक्त खाटांचे नियोजन सुरू झाले. त्या लाटेत प्रत्येकाच्या घरातील,नात्यातील अथवा मित्रमंडळीतील एखाद्याला तरी कोरोनाने संपविले होते. अशा भयानक स्थितीत माणूस जगला पाहिजे, कोरोनाची लाट ओसरली पाहिजे अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होती. यंदा कोविड लाट ओसरलेली आहे. कोविडनंतर लोक बदलतील, संकटातून बाहेर पडून पुन्हा उभे राहतील असेच सर्वांना वाटत होते. मात्र यंदाच्या एप्रिलमध्ये आपण किळसवाण्या राजकारणाचा उन्माद अनुभवतो आहोत. अशा स्थितीत जगण्याचे प्रश्न मागे पडत आहेत. 

शेजार   धर्म गेला कुठे ?

- मागील वर्षी सर्वजण बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी झगडत होते. यंदा मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून राजकारणाचा फड रंगला   आहे. 

- कोरोनाने कमी पैशांत घर चालविता येते. कुटुंबासह एकत्र तणावमुक्त जगा, तसेच संकटाच्या काळात शेजार धर्म कसा पाळायचा, हे शिकविले. यंदा हे सगळेच विसरून द्वेषाचे राजकारण सुरू आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या