शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

तीन तहसीलचा कारभार प्रभारावर

By admin | Updated: May 27, 2015 02:09 IST

महसूल राज्यमंत्री जिल्ह्यातील असल्याने महसूलातील रिक्त पदांचा अनुशेष दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

यवतमाळ : महसूल राज्यमंत्री जिल्ह्यातील असल्याने महसूलातील रिक्त पदांचा अनुशेष दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र महसूल राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील नेर तहसीलचा कारभार गेल्या चार महिन्यांपासून प्रभारावर आहे. याप्रमाणेच आर्णी व महागाव तहसीलला पूर्ण वेळ अधिकाऱ्याची प्रतिक्षा आहे. महसूल प्रशासनाचा डोल्हारा आजपर्यंत प्रभारावरच चालला होता. आता ही स्थिती बदलेल अशी आशा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यांचा बालेकिल्ला असलेल्या नेर तहसीलमध्येच नायब तहसीलदाराकडून प्रशासनाचा कारभार पाहण्यात येत आहे. याशिवाय बदली होऊनही दोन उपजिल्हाधिकारी रुजू झाले नाही. तब्बल दीड महिन्यांपासून हे अधिकारी रजेवरच आहे. वणी येथील एसडीओ महाजन यांची रोहयो उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. अनेक वर्षानंतर रोहयो विभागाला पूर्ण वेळ अधिकारी मिळाला. मात्र महाजन यांनी अजूनही रोहयोचा पदभार स्वीकारलेला नाही. तसेच यवतमाळ एसडीओ नरेंद्र टापरे यांच्याकडे महसूल उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांंनीही अद्यापपर्यंत हा पदभार स्वीकारलेला नाही. दीड महिन्यांपासून हे दोन्ही अधिकारी आपल्या जागेवर रुजू झाले नाही. एकीकडे गतीमान प्रशासनासाठी मंत्री व अधिकारी धडपड करत आहे. आता या रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. पालकमंत्री व महसूल राज्यमंत्री म्हणून संजय राठोड यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. किमान प्रशासनातील रिक्तपदे वेळेत भरली जावी जेणे करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढता येईल. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून शासनस्तरावरच विशेष लक्ष्य दिले जात आहे. जलयुक्त शिवारासारखे अभियान राबविले जात असताना रोहयो उपजिल्हाधिकाऱ्याचे पद रिक्त राहणे ही अतिशय गंभीर बाब आहे. येथे पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच कारभाराचे वाभाडे काढण्यात आले होते. त्यानंतर बदली होऊनही येथील अधिकारी अद्यापही रुजू झालेले नाहीत. रोहयो विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा अनुशेष आहे. अतिशय तोकड्या मनुष्यबळावर कोट्यवधींच्या योजनांचे नियोजन केले जात आहे. यामुळेच अनेक अनिमियतेची प्रकरणेही यापूर्वी पुढे अली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)