शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्र प्रदर्शनात चंद्रपूर प्रथम

By admin | Updated: August 18, 2015 02:44 IST

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॉटन सिटी फोटोग्राफर क्लबच्यावतीने येथील भावे मंगल कार्यालयात तिसऱ्या

यवतमाळ : जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॉटन सिटी फोटोग्राफर क्लबच्यावतीने येथील भावे मंगल कार्यालयात तिसऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सदर प्रदर्शन १९ आॅगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या छायाचित्र प्रदर्शनात राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांचा यात समावेश होता. महिला छायाचित्रकारांचा सहभाग लक्षणीय राहिला. व्यावसायिक गटात चंद्रपूर येथील देवानंद साखरकर यांच्या छायाचित्राला २१ हजार रुपयांचा पहिला पुरस्कार मिळाला. नागपूर येथील श्रेया गुप्ता ही १५ हजार रुपयांच्या द्वितीय बक्षिसाची मानकरी ठरली. हिंगोली येथील प्रवीण देगावकर याला १० हजारांचा तृतीय पुरस्कार देण्यात आला. एक हजारांचे प्रोत्साहनपर पाच बक्षीस जाहीर करण्यात आले. यामध्ये अमरावती येथील वैभव दलाल, विक्रम दलाल आणि चंद्रपूर येथील गोलू बारहाते यांचा समावेश आहे. हौशी गटामध्ये वर्धा येथील गणेश शेंडे याला १० हजारांचे पहिले बक्षीस, वर्धा येथील तन्मय ठाकरे यांना सात हजारांचे दुसरे तर यवतमाळ येथील करण मून जीवन यांना पाच हजारांचे तिसरे बक्षीस देण्यात आले. प्रत्येकी एक हजारांचे पाच प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले. यामध्ये यवतमाळ येथील विश्वेष दहिवलकर, हिमांशू पाटेकर, चंद्रपूर येथील रोहित बेलसरे, यवतमाळ येथील हरिओम काळे, हरिष जैन यांचा समावेश आहे.सोमवारी सकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, शहर प्रमुख पराग पिंगळे, अनिल दंडे, किशोर इंगळे, संजय रंगे, प्रवीण निमोदिया, जिज्ञेस राणिंगा, प्रा. व्ही.आर. साकरेकर, प्रा. व्ही.आर. घुरडे, प्रा. पी.डी.गावंडे, संघटनेचे अध्यक्ष महेश बुरडकर, सचिव अभय वडगिरे आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)