शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिनियुक्ती कर्मचार्‍यांचे सीईओंपुढे आव्हान

By admin | Updated: May 15, 2014 23:56 IST

जिल्हा परिषदेचे मुख्यालय प्रतिनियुक्तीच्या कर्मचार्‍यांनी हायज्ॉक केले आहे. बदली झाल्यानंतरही त्याच आस्थापनेवर प्रतिनियुक्ती मिळविण्याचा फंडा अनेक वर्षांपासून वापरल्या जात आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेचे मुख्यालय प्रतिनियुक्तीच्या कर्मचार्‍यांनी हायज्ॉक केले आहे. बदली झाल्यानंतरही त्याच आस्थापनेवर प्रतिनियुक्ती मिळविण्याचा फंडा अनेक वर्षांपासून वापरल्या जात आहे. या कर्मचार्‍यांची फळी तोडण्याचे आव्हान सीईओ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यापुढे आहे.

प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी तीन वर्षानंतर कर्मचार्‍यांची प्रशासकीय बदली करण्याचा नियम आहे. मात्र जिल्हा परिषदेत या नियमाला पद्धतशीरपणे हरताळ फासला जात आहे. काही अधिकारी, पदाधिकारी यांची मर्जी संपादित करून अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कर्मचार्‍यांनी ठिय्या मांडला आहे. अशा कर्मचार्‍यांमुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामाची गती मंदावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आठ ते दहा वर्षापर्यंत एकाच टेबलवर काम करण्याचा रेकॉर्ड करणारे कर्मचारी येथे आजही कार्यरत आहे. या कर्मचार्‍यांमध्ये आपणास कुणीही हात लावू शकत नाही, असा समज निर्माण झाला आहे. काही झाले तरी आयुक्तांकडून प्रतिनियुक्ती मिळून आपली जागा अबाधित ठेवतात.

काही कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊनही त्यांना वरिष्ठांकडून कार्यमुक्त केले जात नाही, अशा कर्मचार्‍यांवर विशिष्ट स्वरुपाची जबाबदारी सोपविली जाते. जवळपास सर्वच विभागात अशी विशिष्ट जबाबदारी पार पाडणारे कर्मचारी कार्यरत आहे. विशेष म्हणजे प्रतिनियुक्तीसाठी पद अवनती स्वीकारण्याची तयारीही कर्मचार्‍यांमध्ये आहे.

बदली होऊनही त्याच ठिकाणी असलेल्या कर्मचार्‍यांकडे पाहून सर्वसामान्य कर्मचार्‍यांमध्ये चिड निर्माण होत आहे. मर्जी संपादित करणार्‍यांसाठी नियम ढाब्यावर बसवून सवलती दिल्या जातात. केवळ आर्थिक सुबत्ता आणि राजकीय पाठबळ नसल्यामुळे नियमाप्रमाणे बदली होईल तेथे जावे लागते. अशा स्थितीत काही विशिष्ट कर्मचार्‍यांवर अन्यायही होतो.

जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या विभागांतर्गतही बदल्या झालेल्या नाही. या बदल्या करण्याचा प्रयत्न यापूर्वी सीईओ नवलकिशोर राम यांनी केला. मात्र नंतर हे प्रकरण पद्धतशीरपणे थंडबस्त्यात टाकण्यात आले. मरगळ झटकण्यासाठी संपूर्ण विभागातच मोठय़ा ऑपरेशनची गरज आहे. सीईओ मल्लिनाथ कलशेट्टी बदल्यांपूर्वी कशाप्रकारे ही स्थिती हाताळतात, याकडे कर्मचार्‍यांसोबतच सर्वांचेच लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)