शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

शतकोटी वृक्ष लागवड योजना कागदावरच

By admin | Updated: September 15, 2014 00:24 IST

पर्यावरण समृद्धीसाठी गावागावात शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. मात्र उमरखेड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्ष रोपणाला खो दिला. त्यामुळे शासनाच्या महत्वकांक्षी

उमरखेड (कुपटी) : पर्यावरण समृद्धीसाठी गावागावात शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. मात्र उमरखेड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी वृक्ष रोपणाला खो दिला. त्यामुळे शासनाच्या महत्वकांक्षी योजनेचे तीनतेरा वाजले आहे. ग्रामसेवकांचेही दुर्लक्ष होत असून वृक्ष लागवडीसाठी खोदलेले खड्डेही बेपत्ता आहे. तालुक्यात ही योजना केवळ कागदावरच राबविल्याचे दिसत आहे. वनविभागातर्फे राबविण्यात येणारी शतकोटी वृक्ष लागवड योजनतून राज्यात कोट्यवधी वृक्ष लागवड झाल्याचे शासन सांगते. परंतु उमरखेड तालुक्यातील परिस्थिती मात्र काही वेगळेच दर्शविते. ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या दुर्लक्षित धोरणामुळे ही योजना राबविलीच नसल्याचे दिसत आहे. उमरखेड तालुक्यातील ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळाला. त्यातून वृक्ष लागवड करणे महत्वाचे होते. परंतु तसे झालेच नाही. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीसाठी शासन दरवर्षी ग्रामपंचायतींना आवश्यक निधी देते. मात्र ग्रामपंचायतीने लागवडीत विशेष कामगिरी केल्याचे दिसत नाही. केवळ पैसा कमविणे हाच उद्देश या योजनेत असल्याचे दिसत आहे. इतर कामांची परिस्थिती वेगळी असते. काही ग्रामसेवक तर केवळ थातूरमातूर काम करून शासनाचे वेतन घेतात. बरेचवेळा मजूर कामावर गेल्यानंतर ग्रामपंचायतीचे कर्मचारी जातात व १५ मिनिटे उभे राहून निघून येतात. त्यामुळे ग्रामीण भागासाठी असलेल्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नाही. असेच शतकोटी वृक्ष लागवड योजनेचे झाले आहे. कर्मचारी कागदावरच वृक्षारोपण केल्याचे दाखवित आहे. वृक्ष रोपणच झाले नसताना संगोपनाच्या नावावरही निधी उचलल्याची माहिती आहे. या सर्व प्रकारांची चौकशी होण्याची गरज आहे. मात्र लोकप्रतिनिधीही गप्प दिसत आहे. (वार्ताहर)