जिल्हा बँकेच्या १४ संचालकांची पेशी

By Admin | Updated: January 30, 2016 02:42 IST2016-01-30T02:42:16+5:302016-01-30T02:42:16+5:30

खासगी कामासाठी बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपयांचा खर्च केल्या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ...

Cell of 14 Directors of District Bank | जिल्हा बँकेच्या १४ संचालकांची पेशी

जिल्हा बँकेच्या १४ संचालकांची पेशी

५ फेब्रुवारी : ६० लाख खर्चाचेप्रकरण
यवतमाळ : खासगी कामासाठी बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपयांचा खर्च केल्या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १४ संचालकांची ५ फेब्रुवारी रोजी अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांपुढे पेशी होणार आहे.
नागपूर उच्च न्यायालयाने ६० लाखांच्या या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा बँकेचे १४ संचालक, सीईओ आणि याचिकाकर्ते सदाशिव महाजन यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
५ फेब्रुवारी रोजी व्यक्तीश: हजर राहून अथवा वकिलामार्फत आपली बाजू मांडण्याचे सांगण्यात आले आहे. या १४ संचालकांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. या न्यायालयीन खटल्याचा ६० लाखांचा खर्च बँकेच्या तिजोरीतून केला.
हा खर्च नियमबाह्य असून संचालकांकडून त्याची वसुली करावी, अशी विनंती सदाशिव महाजन यांनी न्यायालयाला केली होती. त्यावरून ही चौकशी केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Cell of 14 Directors of District Bank