शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा क्रीडा कार्यालयात लागले सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Updated: October 12, 2015 02:36 IST

गौरीपूजनाच्या दिवशी येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षात चक्क मद्यपींनी ओली पार्टी झोडली.

यवतमाळ : गौरीपूजनाच्या दिवशी येथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षात चक्क मद्यपींनी ओली पार्टी झोडली. तोडफोड केली होती. एवढेच नव्हे तर या कक्षातील सीपीयूसुद्धा चोरून नेला होता. हा प्रकार पोलिसात पोहचल्यानंतर आता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन तातडीने ते लावण्यात आले आहे. तीन कॅमेरे प्रवेशद्वार, एक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षात आणि एक कर्मचाऱ्यांच्या कक्षात अशाप्रकारे कॅमेरे तीन दिवसांपूर्वीच बसविण्यात आले आहेत. धूमाकूळ घालणाऱ्यांवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून काय कारवाई करण्यात आली आणि धूमाकूळ घालणारे कोण, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात असून मद्यपींना खुद्द जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून संरक्षण देण्याचे कारण कळायला मार्ग नाही. नाही म्हणायला पोलीस तक्रार झाली आहे. परंतु ठोस कारवाई मात्र होताना दिसत नाही. येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपये अनुदानाच्या योजना राबविल्या जातात. यासाठी बरेचदा कार्यालय रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसते. यातूनच चक्क क्रीडा अधिकाऱ्यांच्या कक्षासह परिसरात ओल्या पार्ट्याही रंगतात. सप्टेंबर महिन्यात अशीच एक पार्टी रंगली होती. कार्यालयातीलच कर्मचाऱ्यांची ही पार्टी होती. यथेच्छ मदिरा प्राशन केल्यानंतर झालेल्या वादातून कक्षातील संगणक व केबलची तोडफोड करण्यात आली शिवाय जाताना सीपीयूसुद्धा नेण्यात आला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तेंव्हा तोडफोड व दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरू लागली होती. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी ८ आॅक्टोबरला पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)