शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना शोधताना उमेदवारांची दमछाक

By admin | Updated: November 18, 2016 02:34 IST

नगरपरिषद निवडणुकीने पुसदचे वातावरण ढवळून निघत असून गल्लीबोळात वाहनांद्वारे ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे.

नगरपरिषद निवडणूक : प्रचारासाठी कार्यकर्ते मिळेनापुसद : नगरपरिषद निवडणुकीने पुसदचे वातावरण ढवळून निघत असून गल्लीबोळात वाहनांद्वारे ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. मात्र मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन केलेला प्रचारच विजयाची खात्री देते. त्यामुळेच प्रत्येक उमेदवार मतदारांच्या दारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अनेक मतदारांचा शोधच लागत नसल्याने उमेदवारांची दमछाक होत आहे. तर दुसरीकडे नोटा बंदीमुळे प्रचारासाठी कार्यकर्तेही मिळेनासे झाले आहे. पुसद नगरपरिषदेच्या निवडणुकीत यावेळी खरी रंगत येत आहे. आमदार मनोहरराव नाईकांच्या सौभाग्यवती अनिताताई नाईक निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच वार्डावार्डातही कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढती होत आहे. प्रत्येक उमेदवार विजयासाठी धडपडताना दिसत आहे. मालवाहू वाहनांवर मोठ्ठाले पोस्टर लावून विकासाचे आश्वासन दिले जात आहे. इतरांपेक्षा आपणच कसे सक्षम आहोत हे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सांगितले जात आहे. तसेच सकाळपासून वार्डावार्डात प्रचार रॅली काढली जात आहे. ऐनकेन प्रकारे मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयोग सुरू आहे. मात्र वार्डांची नव्याने रचना झाल्याने अनेक मतदार या प्रभागातून त्या प्रभागात गेले आहे. अशा मतदारांचा शोध घेण्याचे दिव्य उमेदवारांना पार पाडावे लागत आहे. अनेकदा तर आम्ही तुमच्या प्रभागात येत नाही, असे बोल ऐकण्याची वेळही काही उमेदवारांवर आली आहे. परंतु काही का असेना मतदाराच्या दारापर्यंत जाण्यासाठी अनेक जण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. परंतु सध्या नोटा बंदीचा फटका अनेक उमेदवारांना बसत आहे. मतदार यादीतून नाव शोधण्यासाठी कार्यकर्तेच मिळत नाही. सर्व कार्यकर्ते बँकांच्या रागांमध्ये लागले आहे. अशा परिस्थितीत मतदारांच्या दारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. आता यावर काय उपाययोजतात हे विजयाचे गणित ठरविणार आहे. (प्रतिनिधी)सोशल मीडियाचा वापर वाढलामतदारांंना आपलेसे करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप ग्रृपच्या माध्यमातून मतदारांना आपलेसे केले जात आहे. आपण किती प्रभावी आहो, आपल्याला विकास कामांची कशी जाण आहे, शहर कसे स्वच्छ-सुंदर करू असे नानाविध संदेश सोशल मीडियावरून फिरत आहे. परंतु मतदारांच्या ग्रृपमध्ये एकाच वेळी येणारे असंख्य मॅसेज मतदार वाचत असतील याची कुणालाही खात्री नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीवरच सर्वांचा जोर आहे.