शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना हुडहुडी, कार्यकर्त्यांना जोष

By admin | Updated: October 18, 2014 23:02 IST

विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा रविवार ‘सुपर संडे’ ठरणार असून उमेदवारांना आता चांगलीच हुडहुडी भरली आहे. कार्यकर्ते मात्र जोमात

रवींद्र चांदेकर - वणीविधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा रविवार ‘सुपर संडे’ ठरणार असून उमेदवारांना आता चांगलीच हुडहुडी भरली आहे. कार्यकर्ते मात्र जोमात असून आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे छातीठोकपणे सांगत आहे. वणी विधानसभा क्षेत्रात एकूण १३ उमेदवार होते. त्यापैकी पाच उमेदवारांमध्येच खरी लढत झाली. या पाच उमेदवारांमध्ये कॉंग्रेसचे वामनराव कासावार, शिवसेनेचे विश्वास नांदेकर, राष्ट्रवादीचे संजय देरकर, भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू उंबरकर यांचा समावेश होता. हे पाचही उमेदवार मतदान आटोपल्यानंतर आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. त्यांचे कार्यकर्तेही जोमात आहेत. साहेब, भाऊ हमखास निवडून येणारच, असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. मतदानानंतर सर्वच उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आकडेमोड सुरू केली आहे. तथापि, मतदारांनी नेमके काय केले, हे रविवारीच कळणार आहे.रविवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. वणीत तब्बल २३ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे दुपारी ३ वाजतापर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. तथापि सकाळी ११ वाजतानंतरच जनमताचा कौल कळण्यास सुरूवात होणार आहे. पहिल्या फेरीपासून कोणता उमेदवार आघाडी घेतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मात्र मतमोजणी केंद्रनिहाय होणार असल्याने नेमका अंदाज बांधणे कठीण जाणार आहे. कारण एखादा उमेदवार पहिल्या, दुसऱ्या फेरीत आघाडीवर असल्यास तोच उमेदवार २२, २४ व्या फेरीतही आघाडीवर असेलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्कंठा कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या पाचपैकी चार निवडणुका काँग्रेसच्या वामनराव कासावार यांनी जिंकल्या आहे. ते सतत ११९० पासून मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व करीत आहे. त्यांना केवळ २००४ मधील निवडणुकीत पराजयाचा सामना करावा लागला होता. त्यापूर्वी ते तिनदा आमदार होते. चौथ्या निवडणुकीत ते हरले अन् शिवसेनेचे विश्वास नांदेकर जिंकले होते. पाचव्यांदा कासावार यांनी पुन्हा बाजी मारून नांदेकर यांना हरविले. त्यामुळे कासावार यांची ही सहावी निवडणूक आहे. सर्वात अनुभवी उमेदवार तेच आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणता फैसला सुनावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.