शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नेर बाजार समितीवरील प्रशासक मंडळ रद्द

By admin | Updated: October 8, 2014 23:32 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियुक्त प्रशासक मंडळ उच्च न्यायालयाने रद्दबातल केले. या संदर्भात माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी याचिका दाखल केले. या याचिकेवर निर्णय देताना

न्यायालयाचा निर्णय : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजकीय हस्तक्षेप भोवला नेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियुक्त प्रशासक मंडळ उच्च न्यायालयाने रद्दबातल केले. या संदर्भात माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी याचिका दाखल केले. या याचिकेवर निर्णय देताना प्रशासक मंडळ राजकीय हस्तक्षेपातून नियुक्त झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. नेर बाजार समितीच्या संचालक मंडळाची कारकीर्द काही महिन्यांपूर्वी संपली. त्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा प्रस्ताव पुढे आला. सुरुवातीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी जुळवून घेत काँग्रेसचे दहा व राष्ट्रवादीचे सहा या प्रमाणे प्रशासक मंडळाची यादी निबंधकांकडे पाठविण्यात आली. त्यानंतर माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांनी चार जणांची यादी पाठविली. त्यापाठोपाठ तत्कालीन अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या दहा जणांची यादी पाठविली. यादीचा घोळ संपुष्टात येऊन काँग्रेसचे दिलीप पाटील तिमाने यांची मुख्य प्रशासक पदी निवड करण्यात आली. त्यानंतर माजी क्रीडा राज्यमंत्री देशमुख यांची तीन नावे मंजूर झाले व एकदाचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रशासक मंडळ नेर बाजार समितीवर नियुक्त झाले.सदर प्रशासक मंडळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या हस्तक्षेपातून नियुक्त झाल्याचा ठपका ठेवत बाजार समितीचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. बुधवारी न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व बोरा यांनी निर्णय दिला. स्नेहल भाकरे यांनी दाखल केलेली याचिका मंजूर करून यात राजकीय मंडळींचा हस्तक्षेप असल्याचे पुरावे तपासून शासनाने नियुक्त केलेले प्रशासक मंडळ रद्द केले. यावेळी भाकरे यांची बाजू अ‍ॅड. सुभाष पालीवार, सौमित्र पालीवार यांनी मांडली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मोठी चपराक दिल्याची चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)