शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात बैलजोडींची खरेदी-विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

पांढरकवडा बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात तेलंगणासह यवतमाळ जिल्ह्यातील व आजुबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोडी खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारापर्यंत असायचा. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत. ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही.

ठळक मुद्देबाजार पडला ओस : लाखोंची उलाढाल ठप्प, ट्रॅक्टरने वखरणी-नांगरणीचे भाव वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे येथील गुरांच्या बाजारात बैलजोडी खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे दीड महिन्यात लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे बैलांकरवी होणाऱ्या शेतीच्या मशागतीअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.पांढरकवडा बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात तेलंगणासह यवतमाळ जिल्ह्यातील व आजुबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोडी खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारापर्यंत असायचा. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत. ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही. मात्र अजुनही शेतीच्या बऱ्याच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. खरीप हंगामात शेतीची तयारी करीत असताना सरी पाडणे, वखरवाहीसाठी बैलजोडीला प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर गावात शेतरस्ते नाहीत. तेथे शेतमाल वाहतुकीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी महत्त्वाची असते. बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने वखरणी बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. तालुक्यातील व ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याने शेतकरी खरीपाच्या पूर्वमशागतीला लागले आहेत.त्यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे. त्यात वखरणी, नांगरणीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बैलजोडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र बाजार लॉकडाऊन झाल्यामुळे बैलांचे खरेदी-विक्री व्यवहार थांबलेले आहेत. दरम्यान, पुण्या-मुंबईहून अनेकजण परतले असून ते पारंपारिक शेतीकडे वळले आहेत.

टॅग्स :Marketबाजार