दुकानासह घर भस्मसात

By Admin | Updated: October 7, 2014 23:40 IST2014-10-07T23:40:55+5:302014-10-07T23:40:55+5:30

एका किराणा दुकानासह घराला आग लागली. या आगीत दिवाळीसाठी भरुन ठेवलेला किराणा आणि घर भस्मसात झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न

Busted house with shops | दुकानासह घर भस्मसात

दुकानासह घर भस्मसात

करंजखेडची घटना : घराचे पाच लाखांचे नुकसान
महागाव : एका किराणा दुकानासह घराला आग लागली. या आगीत दिवाळीसाठी भरुन ठेवलेला किराणा आणि घर भस्मसात झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही घटना तालुक्यातील करंजखेड येथे मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
महागाव तालुक्यातील करंजखेड येथे संतोष देवरकर यांचे किराणा दुकान आहे. या दुकानालाच लागून त्यांचे घर आहे. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास किराणा दुकानाला अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने संपूर्ण किराणा दुकान कवेत घेतले. तसेच लगतच्या घरालाही या आगीची झळ पोहोचली. काही क्षणातच घरही आगीच्या भक्षस्थानी सापडले. या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.
उमरखेड नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत परिसरातील घरे रिकामे करणे सुरू केले होते. दिवाळीचा सण असल्याने संतोष देवकर यांनी विक्रीसाठी दुकानात दोन लाख रुपयांचा किराणा माल भरला होता. किराणा माल भस्मसात झाला आहे. तसेच त्यांच्या घराचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
घटनास्थळी नायब तहसीलदार एस.एम. पांडे, पंचायत समिती सदस्य संदीप ठाकरे, सरपंच भरोस चव्हाण यांंनी धाव घेतली. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अवघ्या तासाभरात आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीमुळे नुकसान झालेल्या संतोषला मदत देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Busted house with shops